गावोगावी रंगला कर तोडण्याचा थरार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

कोल्हापूर - बेंदूर सणानिमित्त म्हाळुंगे (ता. करवीर) येथे कर तोडण्याचा सोहळा पारंपरिक थाटात साजरा झाला. मंदिराजवळ आडव्या बांधलेल्या पिंपळाच्या तोरणावरून बैलाने झेप घेण्याच्या क्षणास कर तोडणे, असे ओळखले जाते.

सायंकाळी चार वाजता मानाचा सजविलेला बैल सयाजी चव्हाण, हिराजी चव्हाण यांच्या घरातून वाजत-गाजत गावातील चौकात आणण्यात आला. तेथे त्याला मोकळे सोडल्यानंतर तो बैल धावत अंबाबाई मंदिराकडे आला. तेथील मार्गात थोड्या उंचीवर पिंपळाचे तोरण आडवे बांधले होते. या तोरणावरून बैलाने झेप घेतली. हा क्षण आज असंख्यांनी आपल्या मोबाईलवर टिपला. आज बेंदूरसणामुळे म्हळुंगे ग्रामस्थ सकाळपासून या सोहळ्याच्या तयारीत होते, हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांचे नातावाईकही आले होते.

Web Title: Kolhapur News Karnataki Bendur

टॅग्स