रात्री साडेबाराला ‘केशवराव’ बंद म्हणजे बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणानंतर आता नाट्यगृहात कार्यक्रमांची संख्या वाढली आहे. काही कार्यक्रम रात्री दहाला सुरू होतात आणि ते रात्री एक-दीडपर्यंत चालतात; मात्र कलाकार-तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आता नाट्यगृहातील कुठलाही कार्यक्रम रात्री साडेबाराला बंद म्हणजे बंद, असा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. 

संगीत मैफल किंवा ऑक्रेस्ट्रांचे कार्यक्रम रात्री नऊची वेळ देऊन दहाच्या सुमारास सुरू होतात. काही नाटकांच्या प्रयोगाबाबतही असेच घडते. विशिष्ट थीम घेऊन एखादी मैफल असते. त्या वेळी फर्माईशी आणि वन्समोअरचा धडाका सुरू होतो. त्यामुळे मध्यांतरासह तीन तासांचा कार्यक्रम असे जरी गृहित धरले तरी एकच्या पुढे हे कार्यक्रम चालतात आणि पुढे नाट्यगृह रिकामे व्हायला दोन वाजतात. 

रात्री दहाला कार्यक्रम सुरू करण्यामागे कोल्हापूरचे प्रेक्षक रात्रीचे जेवण करूनच मग कार्यक्रमांना येतात, अशी भ्रामक मानसिकता होती; मात्र यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेच्या निमित्ताने सायंकाळी सातला प्रयोग घेतले तरी नाट्यगृह हाऊसफुल्ल होते, याची प्रचिती देत ही मानसिकता खोडून काढली आहे. त्यामुळे आता रात्री नऊ-सव्वानऊला कार्यक्रम सुरू करून तो बारा-सव्वाबारापर्यंत संपून नाट्यगृह साडेबाराला रिकामे झाले पाहिजे, असा निर्णय झाला आहे. दरम्यान, संयोजक संस्था, वितरकांनी हा निर्णय मान्य केला आहे; मात्र त्याची अंमलबजावणी करताना महापालिकेस व्यवस्थापनाला खमके पाठबळ द्यावे लागणार आहे.

Web Title: kolhapur news Keshavrao Bhosale Theater

टॅग्स