केएमटीचे दुखणे

डॅनियल काळे
बुधवार, 9 मे 2018

कोल्हापूर - महापालिकेच्या परिवहन विभागाने (केएमटी) केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून घेतलेल्या ७५ बसेसपैकी २० बसेस नादुरुस्त आहेत. या बसेस डेपोमध्ये पडून आहेत.

कोल्हापूर - महापालिकेच्या परिवहन विभागाने (केएमटी) केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून घेतलेल्या ७५ बसेसपैकी २० बसेस नादुरुस्त आहेत. या बसेस डेपोमध्ये पडून आहेत. तीन वर्षांतच बसची ही अवस्था झाली आहे. 

याउलट जुन्या काही बसेस आजही प्रवासी वाहतुकीसाठी उपयुक्त पडत आहेत. नव्या बसेसची क्षमता आणि दर्जा यावरच यावरून चर्चा सुरू आहे. तीन वर्षांत वर्कशॉपमध्येच पडून असणाऱ्या बसेस दुरुस्तीला आल्या. स्टेअरिंग जाम होण्यापासून ते दरवाजे उघडत नसल्यापर्यंतच्या अनेक तक्रारी आहेत.

महापालिकेला जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून तत्कालीन केंद्र सरकारने १०४ बसेसना ४४ कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीमधून पहिल्या टप्प्यात केएमटीने ७५ बसेस खरेदी केल्या. उर्वरित २९ बसेसची निविदा काढण्यात वेळ गेला. त्यामुळे या २९ बसेसचा निधी परत गेला. त्यामुळे केएमटीला १०४ बसेसऐवजी ७५ बसेस मिळाल्या. या बसेस घेऊन तीन वर्षे झाली. पण तीन वर्षांतच त्या घाईला आल्या. पहिल्याच महिन्यात कसबा बावडा येथे चालू केएमटी बसची चाके निखळून पडली होती. 

चालकांनी अनेक बसेसच्या तक्रारी सतत लॉगबुकमध्ये नोंदविल्या. आता तर नव्या ७५ बसेसपैकी ५५ ते ६० बसेसच रस्त्यावर धावतात. 

 

Web Title: Kolhapur News KMT issue