इचलकरंजी येथे तरुणावर चाकू हल्ला 

राजेंद्र होळकर
गुरुवार, 22 मार्च 2018

इचलकरंजी - येथील जवाहरनगर परिसरामध्ये एका तरुणाला चाकूने भोसकले. विशाल कुंभार असे जखमीचे नाव आहे. त्याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना आज दुपारी कबनूर येथील एका हायस्कूलच्या परिसरात घडली आहे.

इचलकरंजी - येथील जवाहरनगर परिसरामध्ये एका तरुणाला चाकूने भोसकले. विशाल कुंभार असे जखमीचे नाव आहे. त्याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ही घटना आज दुपारी कबनूर येथील एका हायस्कूलच्या परिसरात घडली आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम शिवाजीनगर पोलिसात सुरु आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज इयत्ता दहावीच्या परिक्षेचा शेवटचा पेपर होता. त्यामुळे जखमी विशाल कुंभार हा आपल्या परिक्षाथीं भावाला नेण्यासाठी परिक्षा केंद्रावर आला होता. पेपर सुटल्यानंतर परिक्षा केंद्राबाहेर परिक्षार्थी विद्यार्थ्याच्या दोन गटामध्ये उतरपत्रिका न दाखविल्याच्या कारणावरुन वाद झाला. यात विशालच्या भावाला मारहाण करण्यात येत होती. मारहाण करणाऱ्या तरुणाच्या तावडीतून भावाची सुटका करण्यासाठी विशालने धाव घेतली. याचवेळी त्याच्यावर चाकू हल्ला करून एकाने भोसकले.

जखमीला उपचारासाठी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून, पुढील उपचाराकरीता त्याला येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे.

Web Title: Kolhapur News Knife attack in Ichalkaraji