कोल्हापूर पुरूष फुटबॉल संघास आंतर जिल्हा स्पर्धेचे अजिंक्यपद

संदीप खांडेकर
रविवार, 10 जून 2018

कोल्हापूर - नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरूष फुटबॉल चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेत के. एस. ए. कोल्हापूर पुरूष फुटबॉल संघाने नागपूर जिल्हा फुटबॉल संघाचा (५-१) गोलफरकाने पराभव करून आंतर जिल्हा स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. केएसए स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेते ठरले.वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे स्पर्धा झाली.

कोल्हापूर - नाशिक येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा पुरूष फुटबॉल चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेत के.एस.ए. कोल्हापूर पुरूष फुटबॉल संघाने नागपूर जिल्हा फुटबॉल संघाचा (५-१) गोलफरकाने पराभव करून आंतर जिल्हा स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. केएसए स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजेते ठरले.वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे स्पर्धा झाली.

केएसएच्या सूरज शिंगटेने ७ व्या मिनिटालाच निखील कुलकर्णीच्या पासवर हेडद्वारे उत्कृष्ट गोलची नोंद करून संघास १ -० गोलफरकाने आघाडीवर नेले. नागपूर संघाने
३० व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे गोल नोंदवून सामना १-१ गोलबरोबरीत आणला. 

उत्तरार्धात केएसएने उत्तम खेळाचे प्रदर्शन करताना निखील कुलकर्णी, प्रथमेश हेरेकर, सिद्धेश यादव यांनी अनुक्रमे ५४,
५२, ६१ व्या मिनिटास गोल केला. संकेत साळोखे याने ७३ व्या मिनिटाला गोल नोंदवला.

केएसएकडून निखील कुलकर्णी, प्रथमेश हेरेकर, प्रतिक बदामे यांनी आघाडी, स्वराज्य सरनाईक, सिदेश यादव, संकेत साळोखे यांनी मध्य व मसूद मुल्ला, पवन माळी, हरिष पाटील व श्रेयस मोरे यांनी डिफेन्स फळीत उत्कृष्ट खेळ केला. कर्णधार गोलरक्षक आकाश मेस्त्रीने उत्कृष्ट गोलक्षेत्ररक्षण केले. राजेंद्र धारणे व गजानन मनर्तकर यांनी संघाला मार्गदर्शन केले.

संघ असा : आकाश मेस्त्री(कर्णधार), निखील कुलकर्णी (उपकर्णधार), अनिकेत पोवार(गोलरक्षक)अश्विन
टाकळकर, सुनित पाटील, सौरभ हारूगले, हरिष पाटील, सिजेश यादव, श्रेयस मोरे, सुरज शिंगटे, संकेत साळोखे,
स्वराज्य सरनाईक, सोमेश पाडळकर, सुयश हांडे, शुभम जाधव, शाहू भोई, पार्थ बदामे, प्रथमेश हेरेकर, पवन माळी, मसूद मुल्ला.

Web Title: Kolhapur News Kolhapur boys football team wins