शहीद झालेल्या पोलिसांचे कुटुंबीय आदरादिथ्याने भारावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

कोल्हापूर - नक्षलींशी लढताना शहीद झालेल्या गडचिरोलीतील ४० पोलिसांचे कुटुंबीय कोल्हापूर भेटीसाठी आले आहे. या कुटुंबाना राज्य सरकारने आधार जरूर दिला; पण हे कुटुंबीय त्यांच्या दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडावेत, त्यांना महाराष्ट्र दर्शन घडावे या हेतूने या सहलीचे आयोजन केले आहे. त्यानुसार गेले दोन दिवस ४० शहीद पोलिसांच्या कुटुंबातील ८२ जण कोल्हापुरात आले आहेत.

दोन दिवसांच्या त्यांच्या वास्तव्यात त्यांनी पन्हाळा, जोतिबा, नृसिंहवाडी, कणेरी मठ, महालक्ष्मी मंदिर, नवा राजवाडा, जुना राजवाडा, भवानी मंडप ही स्थळे पाहिली. पन्हाळ्यातील धुके, पावसाचा आनंद घेतला. पोलिसांनीही बांधवांच्या कुटुंबीयांचा पाहुणचार केला.

गडचिरोलीतील शहीद पोलिसांचे कुटुंबीय देशाला अभिमान आहे. ही सारी मंडळी पोलिस परिवाराचा घटक आहेत. त्यामुळे त्यांचा पाहुणचार आमचे कर्तव्य आहे.
- सतीश माने, गृह पोलिस उपअधीक्षक

Web Title: Kolhapur News kolhapur respect to Family of martyred police