भीमा कोरेगावचे कोल्हापूर जिल्ह्यात पडसाद; इचलकरंजीत निषेध मोर्चा

 इचलकरंजी ः येथे मंगळवारी सकाळी काढण्यात आलेली निषेध फेरी. या दरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना कार्यकर्ते.
इचलकरंजी ः येथे मंगळवारी सकाळी काढण्यात आलेली निषेध फेरी. या दरम्यान व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना कार्यकर्ते.

इचलकरंजी -  भीमा-कोरेगांव येथील घटनेच्या निषेधार्थ आज आंबेडकरवादी कार्यकर्त्यानी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच मुख्य मार्गावरुन मोटारसायकल रॅली काढली. रॅली दरम्यान कार्यकर्त्यानी अत्यावश्‍यक सेवा वगळता व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. 

भीमाकोरेगांव येथे सोमवारी दलित समाजातील व्यक्तीच्यावर जो प्राणघातक हल्ला करुन मोटारीची जाळपोळ केली. घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरवादी कार्यकर्ते येथील सिध्दार्थनगरामध्ये एकत्रित जमा झाले. तेथून सर्व कार्यकर्ते मोर्चाने मध्यवर्ती बस स्थानक समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर आले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे या परिसरातील सर्व वाहतुकीची कोंडी झाल्याने झाल्याने वाहनाच्या रांगा लागल्या.

दरम्यान, प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी आंदोलनस्थळी येवून निवेदन स्वीकारावे अशी भुमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी आंदोलकांशी चर्चा केली. चर्चेतून प्रांताधिकारी श्री. शिंगटे आंदोलनास्थळी येऊ शकत नाहीत. परंतु ते कार्यालयाबाहेर येवून निवेदन स्वीकारतील असे सांगण्यात आले. त्यानंतर कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चाने प्रांत कार्यालयवर आले. याठिकाणी प्रा.शरद कांबळे, अरुण कांबळे, विश्‍वजीत कांबळे आदीची भाषणे झाली. त्यानंतर माजी नगरसेवक अमृत कांबळे, अजय कांबळे, उमेश कांबळे, सिध्दार्थ कांबळे, चित्तनन्दन कांबळे, सोन्या कांबळे, अशोक कांबळे आदींच्या हस्ते प्रांताधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन दिले. 

दानोळी कडकडीत बंद 
दानोळी - 
भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचा निषेधार्थ आज येथे बंद पाळण्यात आला. प्रशासनाविरुध्द आणि समाज कंटकाच्या विरुध्द घोषणाबाजी केली. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाज बांधवाची मनोगत झाली. यावेळी पंचायत समिती सदस्य सुरेश कांबळे, रिपब्लिकन पार्टी विद्यार्थी आघाडी शिरोळ तालुका अध्यक्ष पदमाकर कांबळे, भिमछाया तरुण मंडळाचे अध्यक्ष विलास कांबळे, अजित कांबळे यांची मनोगते झाली. निषेध सभेचे आभार हिदुराव कांबळे यानी मानले. गौतम कांबळे, बबन कांबळे, सुधीर कांबळे, सचिन कांबळे, विकास कांबळे, अनिल कांबळे, उत्तम कांबळे, उमेश कांबळे, संदिप कांबळे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

जयसिंगपुरात निषेध 
जयसिंगपूर - 
भीमा कोरेगाव घटनेचा आंबेडकरवादी समाज, पक्ष व संघटनांनी निषेध केला. जयसिंगपूर पोलिस ठाण्याला दिलेल्या निवेदनात शासन दरबारी या निषेधाची नोंद व्हावी, अशी मागणी केली. निवेदनावर संजय निकाळजे, सुनील शेळके, अरविंद धुमाळ, अब्दुल बागवान, सुभाष साठे, प्रदीप गदगडे, शशिकांत कांबळे, रजनीकांत कांबळे, अशोक भोरे, गौतम वाघवेकर, गुलाब मोमीन, परशुराम बनपुरी, शिवाजीराव पवार, उत्तम वाघवेकर, लक्ष्मण सकटे यांच्या सह्या आहेत. 

गडहिंग्लज प्रांतसमोर निदर्शने 
गडहिंग्लज - 
संविधानाचा अवमान करणारे केंद्रीय मंत्री हेगडे यांच्यासह कोरेगावमधील दगडफेक घटनेच्या निषेधार्थ येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी निदर्शने केली. माजी आमदार ऍड. श्रीपतराव शिंदे, प्रकाश कांबळे, प्रा. आशपाक मकानदार, प्रा. पी. डी. पाटील, महेश सलवादे यांची भाषणे झाली. 

दरम्यान, प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून महादेव मुत्नाळे यांच्याकडे निवेदन सादर केले. कर्नाटकचे केंद्रीय मंत्री हेगडे यांनी संविधान बदलाची भाषा केली आहे. असे विधान करून त्यांनी संपूर्ण देशाचा अवमान केला आहे. त्यांच्या या विधानाचा व पक्षाचा जाहीर निषेध नोंदवला. भीमा कोरेगाव येथे दरवर्षी 1 जानेवारीला शौर्य गाजवलेल्या बांधवांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या बौद्ध बांधवांना जाणीवपूर्णक काही जातीय शक्तींनी दगडफेक करून जखमी केले. दलित समाजाच्या भावना ज्यामध्ये गुंतलेल्या आहेत, त्याच दिवशी जाणीवपूर्वक अशा घटना घडत आहेत. कोरेगावमधील घटनेचाही निषेध नोंदवण्यात आला.

या घटनेत सहभागी असणाऱ्यांवर ऍट्रॉसिटी कारवाई करण्याची मागणी केली. पी. बी. रक्ताडे, सुभाष कोरे, रमजान अत्तार, शिवाजी पाटील, शिवाजी नाईक, एन. व्ही. गावडे, नगरसेवक हारूण सय्यद, रेश्‍मा कांबळे, सावित्री पाटील, रूपाली परीट, बाळेश नाईक, डॉ. डी. जी. चिघळीकर, रमेश शिंगे, परशुराम कांबळे, शांतीरत्न महादेव कांबळे आदी निदर्शनात सहभागी झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com