कृष्णा, पंचगंगा प्रदुषणप्रश्‍नी नृसिंहवाडी, औरवाडसह आठ गावांत बंद

जितेंद्र आणुजे
बुधवार, 16 मे 2018

नृसिंहवाडी - कृष्णा, पंचगंगा नदी प्रदुषणप्रश्नी आज नृसिंहवाडी, आैरवाडसह आठ गावात आज बंद पाळण्यात आला. या बंदला सर्व पक्षांनी पाठींबा जाहिर केला होता. नृसिंहवाडी येथील मरगाई चौकात युवा नेते अनंतराव धनवडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

नृसिंहवाडी - कृष्णा, पंचगंगा नदी प्रदुषणप्रश्नी आज नृसिंहवाडी, आैरवाडसह आठ गावात आज बंद पाळण्यात आला. या बंदला सर्व पक्षांनी पाठींबा जाहिर केला होता. नृसिंहवाडी येथील मरगाई चौकात युवा नेते अनंतराव धनवडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेेळी मान्यवरांनी प्रदुषणप्रश्‍नी मनोगत व्यक्त करून आंदोलन केले. शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर, उद्यान पंडित गणपतराव पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या परविन पटेल, पंचायत समिती सदस्या रुपाली मगदूम, अनंतराव धनवडे, दादेपाशे पटेल, रणजित पाटील, सुकुमार किणींगे, अफसर पटेल, शफी पटेल, यांची प्रमुख उपस्थिती होती. 

राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले, ""पंचगंगा नदीच्या पात्रात दूषित पाणी सोडल्यामुळे नदी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्या शहरातून दूषित पाणी नदीत सोडले जाते त्यामुळे कृष्णा नदीची भविष्यात भयावह स्थिती निर्माण होईल. प्रदूषणप्रश्‍नी आज आठ गावे बंद करून मोठ्या प्रमाणात येथे उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. प्रशासनाने जर वेळीच दखल घेतली नाही तर आठ गावातील जनतेच्या सहकार्याने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू .'" 

गणपतराव पाटील म्हणाले" ""नदीच्या दूषित पाण्यामुळे तालुक्‍यातील जनतेला आजारांना निमंत्रण द्यावे लागत आहे. कॅन्सर आजाराची रूग्ण वाढत आहे. हे कमकुवत प्रशासनाचे उदाहरण आहे. लोकांना कृष्णा व पंचगंगा नदीपात्र शुध्द करून स्वच्छ पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे. प्रदुषणाबरोबरच क्षारपडचा प्रश्न निकालात निघेल."" 

संयोजक अनंतराव धनवडे म्हणाले, ""कोल्हापूर व इचलकरंजी येथील रसायन मिश्रितपाणी नदीत मिसळल्यामुळे पाण्यात पांढऱ्या आळ्या तयार होत आहेत. नृसिंहवाडीसह नदी पलीकडील सात गावे, व्यापारी यांच्यासह अनेक घटक, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी बंद करून सहकार्य केले. यापुढे प्रदुषणप्रश्‍नी प्रशासनाने लक्ष न दिल्यास आठ गावांच्या वतीने पिण्याच्या पाण्यासाठी लढा  उभारू.'' 

जिल्हा परिषदेच्या सदस्या परविन पटेल म्हणाले,"" नृसिंहवाडी सह नदी पलीकडील सात गावांचा प्रदूषणप्रश्‍न जिल्हा परिषद सभागृहात मांडून पाण्याचा हक्कांसाठी लढा उभारू.'' 

 दादेपाशे पटेल, पंचायत समिती सदस्या रूपाली मगदूम, डॉ. मुकुंद पुजारी, डॉ. किरण आणुजे, रणजित पाटील, भाजपचे मुकुंद पुजारी, धनाजीराव जगदाळे, विनीता पुजारी, मल्लाप्पा चौगुले, महावीर कुंभोजे, ललिता बरगाले यांनी प्रदूषणप्रश्‍नी मनोगत व्यक्त केले. 

नायब तहसीलदार र. वा. दिघे म्हणाले, ""आपल्या भावना शासन स्तरावर पोहचवून जनतेच्या शुध्द पिण्याच्या पाण्यासाठी प्रयत्नशील राहीन."" 

Web Title: Kolhapur News Krishna, Panchganga River Pollution issue