कोल्हापूर कृषी बाजार समिती सभापतीपदी कृष्णात पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कसबा सांगाव (ता. कागल) येथील कृष्णात पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज (मंगळवार) दुपारी  बाजार समिती कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड जाहिर करण्यात आली.

कोल्हापूर - कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कसबा सांगाव (ता. कागल) येथील कृष्णात पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आज (मंगळवार) दुपारी  बाजार समिती कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड जाहिर करण्यात आली. कागल-राधानगरीच्या प्रांताधिकारी मनीषा कुंभार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. 

सभापतीपदासाठी कृष्णात पाटील यांचे नाव परशराम खुडे यांनी सुचविले, तर विलास साठे यांनी अनुमोदन दिले. याला सर्व संचालकांनी मंजुरी दिली. निवडीनंतर कृष्णात पाटील यांचा संचालकांसह पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

या वेळी बाजार समितीचे संचालक सदानंद कोरगावकर, भगवान काटे, बाबा लाड, अॅड. किरण पाटील, विलास साठे, नाथाजी पाटील, अमित कांबळे, ए. डी. पाटील, नंदकुमार वळंजू यांनी बाजार समितीच्या कार्याचा आढावा घेत पाटील यांना कामकाजाबाबत सूचना केल्या. 

शेतकरी संघाचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी बाजार समितीच्या कारभाराचा आढावा घेत इथून पुढेही एकीने राहून बाजार समिती राज्यात आदर्शवत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. या वेळी माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, सर्व संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News krushant patil selected