उद्यापासून ‘लक्ष्य’ करिअर प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

कोल्हापूर - करिअरच्या विविध संधींची सर्वांगीण माहिती देणाऱ्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या क्रिएटिव्ह ॲकॅडमी प्रस्तुत ‘लक्ष्य’ करिअर प्रदर्शनाला मंगळवार (ता. ३०) पासून सुरवात होत आहे. 

संत गजानन शिक्षण संस्था महागाव, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी यड्राव, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत. बसंत बहार मार्गावरील हॉटेल पॅव्हेलियनमधील मधुसूदन हॉल येथे तीन दिवस हे प्रदर्शन चालेल. स्टॉल प्रदर्शनाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. मोजकेच स्टॉल शिल्लक आहेत. 

शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी व पालकांच्या मनात एकच प्रश्‍न डोकावतो, तो म्हणजे पुढे काय? याच प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यास सकाळ ‘लक्ष्य’ करिअर प्रदर्शन मदत करणार आहे. करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचा होणारा संभ्रम या प्रदर्शनामुळे दूर होईल. विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन म्हणजेच ‘फॉर राईट चॉईस ऑन राईट टाईम’ ठरणार आहे. एकाच ठिकाणी विविध शैक्षणिक संधींचा खजिना खुला करण्यासाठी सहभागी संस्थांनाही हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे. या प्रदर्शनात संगणक, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, अभियांत्रिकीच्या विविध शाखा, मेडिकल आणि ॲनिमेशन, बॅंकिंग आदी संस्थांचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांच्या स्टॉलसह इतर विविध विद्या शाखांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध क्‍लासेसचा प्रदर्शनात सहभाग असेल. 

याशिवाय प्रदर्शनाच्या कालावधीत करिअर मार्गदर्शन व शिक्षणाची संधी यावर व्याख्यानही होणार आहेत. 

व्याख्यानांची पर्वणी -
३० मे - दुपारी चार वाजता  महेश थोरवे (युपीएससी, एमपीएससी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन)
सायंकाळी साडेपाच वाजता एन. ए. शेख, क्रिएटिव्ह ॲकॅडमी, आकुर्डी पुणे
(८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन)

३१ मे - सकाळी ११ वाजता शिरीष शितोळे, पुणे (करिअर घडवताना)
दुपारी साडेबारा वाजता सौरभ शरनाथे, पुणे (डिजिटल मार्केटिंग)
दुपारी चार वाजता डॉ. जितेंद्र सांडू (स्ट्रेस मॅनेजमेंट)
सायंकाळी साडेपाच वाजता दिवेकर ठाणेकर (कल चाचणी परीक्षा)

१ जून - सकाळी ११ वाजता मा. डॉ.क्षितिज पाटुकले (दहावी बारावीनंतर काय?)
दुपारी १२ वाजता लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर, पुणे (एन.डी.ए. प्रवेश आणि त्याची तयारी)

पुण्यातील क्रिएटिव्ह ॲकॅडमीविषयी
पुण्यातील क्रिएटिव्ह ॲकॅडमी ८ वी ते १२ वी सायन्स विद्यार्थ्यांसाठी शाळा महाविद्यालयाच्या अभ्यासासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय करिअरसाठी संपूर्ण तयारी करून घेणारी ही संस्था गेली १० वर्षे कार्यरत आहे. आठवीपासूनच आयआयटी फौंडेशन तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. या शिवाय इंजिअरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षेची तयारीही येथे करून घेतली जाते.

Web Title: kolhapur news laksha carrier exhibition