‘सेल्फ डिफेन्स’ शिका आता सोशल मीडियावर

लुमाकांत नलवडे
सोमवार, 19 मार्च 2018

कोल्हापूर - निर्भया असो किंवा कोपर्डीच्या घटनेनंतर महिला-मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे अधोरेखित झाले. महिला, मुलींचे छेडछेडीचे प्रकार, एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले यातून स्वसंरक्षण मिळण्यासाठी व्हाईट आर्मीने पुढाकार घेतला आहे.

मुली-महिलांनी स्व-संरक्षण कसे करावे, याचे आठ प्रकार त्यांनी निवडले आहेत. त्यातून कशा पद्धतीने संरक्षण करायचे याच्या चित्रफिती तयार केल्या आहेत. ‘व्हॉटस्‌ ॲप’, फेसबुकद्वारे त्या फॉरवर्ड करून महिला-मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सर्वंकष प्रबोधन
छेडछाडीला विरोध, ॲसीड हल्ल्यावेळी घ्यावायची काळजी, चाकू हल्ल्यावेळी उपाययोजना, रात्री महिलेला एकटेच बाहेर पडावे लागले तर घ्यावयाची काळजी, कॉलेज परिसरात, बसमध्ये होणाऱ्या छेडछाडीला रोखठोक उत्तर कसे द्यावे. मिरचीपूड, छोटे कटर यांसारखी संरक्षणाला आवश्‍यक साधने हाताळावीत, याचेही प्रबोधन करण्यात येत आहे.

मुली-महिलांची सुरक्षा हा एक गंभीर प्रश्‍न पुढे आला आहे. त्यातून बचावासाठी, जनजागृतीसाठी पोलिसांनी निर्भया पथकाची स्थापना करून छेडछाडीला रोखण्याचा प्रयत्न केला. काही महिला प्रणीत संस्थांनी एक-दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले; मात्र सर्वच महिलांना शिबिरात सहभागी होणे, कराटे, तायक्वाँदो यासारखे प्रकार शिकणे शक्‍य होत नाही. प्रत्येक मुलीस-महिलेस जीन्स पॅन्ट घालून समाजात वावरता येत नाही.

प्रत्येक महिलेला कराटे-तायक्वाँदो सारखे प्रशिक्षण घेता येत नाही. ठिकठिकाणच्या शिबिरांना त्यांना हजर राहता येत नाही. त्यांच्यासाठी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यामातून सेल्फ डिफेन्सचे धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची शॉर्ट फिल्मही तयार केली आहे. छोट्या छोट्या १०-१२ क्‍लिप तयार केल्या आहेत. व्हॉटस्‌ ॲप ग्रुपवर फॉर्वर्ड करीत आहोत. ज्यांच्याकडे या क्‍लिप पोचल्या आहेत त्यांनीही त्या इतरांना फॉर्वर्ड कराव्यात.
- अशोक रोकडे, 

अध्यक्ष -जीवनमुक्ती-व्हाईट आर्मी

म्हणूनच साडीतसुद्धा महिलांनी स्वसंरक्षण कशा पद्धतीने करावे, याचे धडे देण्याचा प्रयत्न ‘व्हाईट आर्मी’ या समाजसेवी संस्थेने केला आहे. सानेगुरुजी वसाहतीमध्ये मुलांच्या छेडछाडीला कंटाळून एका मुलीने आत्महत्या केली. शाळेला जाताना रिक्षा चालक छेड काढतो म्हणून शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

असेच प्रकार घडले तर ‘बेटी बचाओ.. बेटी पढाओ’ चा नारा देत जनजागृती करण्यात काहीच अर्थ राहणार नाही. त्यामुळेच व्हाईट आर्मीने महिलांशी संवाद साधून दोन मिनिटांपासून ते बारा मिनिटांपर्यंतच्या चित्रफिती तयार केल्या आहेत. ठिकठिकाणी याचे प्रात्यक्षिक दाखविले आहेत. त्याचेही चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर प्रसारित केले आहे. या चित्रफितीच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या, त्यांच्या इंटरनेटवर, मोबाइल हॅण्डसेटवर स्वसंरक्षणाचे धडे घेता येणार आहेत.

Web Title: Kolhapur News Learn 'self defense' now on social media