राजाराम महाराजांचे नाव देण्याचा ठराव करू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुख्यमंत्री फडणवीस यांची विमानतळ नामकरणाबाबत ग्वाही

कोल्हापूर - कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्यास राज्य शासन अनुकूल असून, याबाबत आवश्‍यक विधिमंडळाचा ठराव संमत करू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 
राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी आमदार अमल महाडिक यांच्याबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांना केंद्र सरकारबरोबर झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रतींसह मागणीचे निवेदन दिले. 

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, छत्रपती राजाराम महाराजांनी दूरदृष्टीने कोल्हापूर विमानतळाची स्थापना करून १९३९ मध्ये उद्‌घाटन केले होते. कोल्हापूर-मुंबई अशी विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू केली होती. ८० वर्षांपूर्वी रेल्वे, एसटीचे जाळेही तयार झाले नव्हते, त्या काळी विमानतळाचा विचार करणे, प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करणे हे दूरदृष्टीच्या नेतृत्वाशिवाय शक्‍य नाही. 

अशा राजांचेच नाव या विमानतळाला देणे गरजेचे आहे, असे श्री. गांधी यांनी सांगितले. 

२०१३ मध्ये केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री महेश शर्मा यांनीही मागणीला पाठिंबा देऊन राज्याची लेखी शिफारस पाठविण्याचे अधिकृत पत्र दिले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही यासंबंधी मुख्यमंत्र्यांना लेखी शिफारस केली असून, आमदार महाडिक यांनी अधिकृत प्रस्ताव सादर केला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार राज पुरोहित यांनीही विधिमंडळात ठराव संमत करून घेण्यासाठी सहकार्याचे आश्‍वासन दिले.

वीस वर्षे पाठपुरावा
राजारामपुरी व्यापारी असोसिएशन २० वर्षे यासाठी प्रयत्न करीत आहे. केंद्रीय विमान वाहतूक प्राधिकरणाने प्रथम ३१ जानेवारी २०१३ ला अधिकृत प्रतिसाद देऊन यासाठी राज्य विधिमंडळाचा ठराव पाठविण्याची आवश्‍यकता असल्याचे पत्र पाठविले.

Web Title: kolhapur news Let's make a resolution to give the name of Rajaram Maharaj