महालक्ष्मी, सह्याद्री एक्‍स्प्रेस रद्द

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 मार्च 2018

कोल्हापूर - मिरज-पुणे रेल्वे मार्गावर जेजुरीजवळ मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरल्याने कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या महालक्ष्मी आणि सह्याद्री एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर - मिरज-पुणे रेल्वे मार्गावर जेजुरीजवळ मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरल्याने कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या महालक्ष्मी आणि सह्याद्री एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, आज (मंगळवारी) मुंबईहून कोल्हापूरला येणारी रेल्वे रद्द केली आहे. त्यामुळे पुणे व मुंबई मार्गावर प्रवाशांना फटका बसला. प्रवाशांना ही माहिती समजताच त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

जेजुरी रेल्वे स्थानकाजवळ दुपारी चारच्या सुमारास पुण्याहून मिरजेकडे येणाऱ्या मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले. त्यामुळे रुळांचे किरकोळ नुकसान झाले असून, पुणे-मिरज रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे सेवा बंद झाल्याने बसस्थानकावर प्रवाशांनी मोठी गर्दी केली. दरम्यान, मुंबई व पुण्यास जाणारी रेल्वे रद्द झाल्याचे समजल्यानंतर खासगी वाहतूकदारांनी तिकीट दरांत वाढ केली. अनेकांनी शिवशाही, एशियाडने जाणे पसंत केले.

रेल्वे रद्द झाल्याने 

  • खासगी वाहतूकदारांकडून 

  • तिकीट दरात वाढ

  •  एसटीच्या सर्व गाड्या हाऊसफुल्ल

  •  प्रवाशांकडून अधिकारी धारेवर

रेल्वे स्थानकावर तिकीट विक्री केंद्राबाहेर कोल्हापूरहून मुंबई-पुण्यास जाणारी रेल्वे रद्द केल्याचा फलक लावला आहे. त्यावर उद्या (मंगळवार) मुंबईहून कोल्हापूरला येणारी रेल्वेही रद्द केली. तसेच, उद्याची सह्याद्री एक्‍स्प्रेसही पुण्यापर्यंत येऊन पुन्हा पुण्याहून मुंबईला जाईल. वेळेत काम पूर्ण झाल्यास आज (मंगळवार) सकाळी मुंबईहून कोल्हापूरला येणारी रेल्वे नियमित सुरू राहील.

Web Title: Kolhapur News Mahalaxmi, Sahyadri Express cancelled