अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचा ३० पानी अहवाल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचा ३० पानी अहवाल शासनाला पाठविला आहे. या अहवालाबरोबर संकलित झालेले पाच ते सहा हजार पानांचे पुरावेही सादर केले असल्याचे श्री. सुभेदार यांनी सांगितले.

कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबतचा ३० पानी अहवाल शासनाला पाठविला आहे. या अहवालाबरोबर संकलित झालेले पाच ते सहा हजार पानांचे पुरावेही सादर केले असल्याचे श्री. सुभेदार यांनी सांगितले.

दरम्यान, मंदिरात पुजारी नेमण्याबाबत निर्णय शासन घेणार असून, वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया पूर्ण केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.   

श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीचे आंदोलन तीव्र झाल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणीद्वारे सर्व घटकांच्या मागणीचा विचार करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाच्या विधी व न्याय विभागाला पाठविण्याचे आदेश दिले.

दरम्यान, श्रीपूजक गजानन मुनीश्‍वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्याच्या सुनावणीत अहवालातून कोणताही निष्कर्ष काढला जाणार नसून, केवळ वस्तुस्थिती आणि विविध घटकांनी दिलेले पुरावे शासनाला सादर करणार असल्याचे यापूर्वीच सांगितले होते. त्यामुळे अहवालाबरोबर पुजारी हटाव संघर्ष समिती, श्रीपूजक मंडळ, उदयसिंह राजेयादव यांच्यासह विविध घटकांनी दिलेल्या पुराव्यांची सहा हजारांवर पानेही जोडली आहेत.   

निष्कर्ष शासनच काढणार 
अंबाबाई मंदिरातील पुजारी हटाव मागणीबाबत कोणताही निष्कर्ष काढण्याचा अधिकार मला नाही. अहवालातून शासनाला केवळ वस्तुस्थिती सांगायची होती. त्यामुळे निष्कर्ष आणि पगारी पुजारी नेमण्याबाबतचा निर्णय शासनच घेणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. सुभेदार यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: kolhapur news mahalaxmi temple Priest