मलेशिया बनावट व्हिसा प्रकरणी बेळगावच्या संशयित एजंटाला अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 मार्च 2018

गडहिंग्लज - मलेशिया बनावट व्हिसाप्रकरणी बेळगावच्या एका संशयित एजंटास आज येथील पोलिसांनी अटक केली. सलमान अब्दुलमुनीव सनदी (वय २७, उचगाव-बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून ७५ हजारांच्या जामिनावर त्याची सुटकाही झाली.

गडहिंग्लज - मलेशिया बनावट व्हिसाप्रकरणी बेळगावच्या एका संशयित एजंटास आज येथील पोलिसांनी अटक केली. सलमान अब्दुलमुनीव सनदी (वय २७, उचगाव-बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून ७५ हजारांच्या जामिनावर त्याची सुटकाही झाली.

बनावट िव्हसा देऊन काही तरुणांची साडेचार लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खलीद गुलाब पटेल (गडहिंग्लज) व सलमान सनदी (बेळगाव) यांच्याविरुद्ध येथील पोलिसांत २३ डिसेंबरला गुन्हा दाखल झाला होता. महमंदरफिक दादाहयात भाई (रा. कडगाव, ता. गडहिंग्लज) याच्यासह अहमद अस्लम इराणी, नागाप्पा मारुती हुलसार, सलीम रफिक शेख, सचिन महादेव गुंठे (सर्व रा. गडहिंग्लज), समद अब्दुलगणी आत्तार (रा. नूल, ता. गडहिंग्लज) यांना परदेशात नोकरीसाठी पाठविण्यासाठी पटेल व बेळगावचा प्रमुख एजंट सलमानने प्रत्येकी ९० हजार रुपये घेतले.

हे दोघेही मलेशियात सर्वांना घेऊनही गेले. परंतु, तेथे गेल्यानंतर िव्हसाची मुदत एक महिन्याचीच असल्याचे समजले. कायदेशीर माहिती घेतल्यानंतर पटेल व सनदीकडून फसवणूक झाल्याचे सर्व तरुणांच्या लक्षात आले. त्यानंतर यातील श्री. भाई याने येथील पोलिसांत येऊन फिर्याद दिली. त्यानुसार पटेलला त्याचवेळी अटक करून कारवाई केली. सनदी हा फरार होता.

दरम्यान, त्याने बेळगावच्या न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतला होता. त्यावेळी, सनदीला अटक करून चौकशीअंती तत्काळ ७५ हजारांच्या जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश बेळगाव न्यायालयाने दिले होते. यामुळे पोलिसांनी सनदीला आज अटक करून ७५ हजारांच्या जामिनावर सोडून दिले. 

Web Title: Kolhapur News Maleshiya Visa Fraud