डॉ. अपर्णा देशमुख यांना माऊली आनंदी पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

कोल्हापूर - श्री सद्‌गुरू विश्‍वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टतर्फे यावर्षीचा माऊली आनंदी पुरस्कार पुणे येथील आभाळमाया संस्थेच्या डॉ. अपर्णा देशमुख यांना जाहीर झाला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, ज्ञानेश्‍वरीची प्रत असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

ट्रस्टतर्फे दरवर्षी समाजातील दीनदुबळ्या, अनाथ, दुर्लक्षित समाजबांधवांची माता होऊन निरपेक्ष सेवा करणाऱ्या स्त्रीचा माऊली आनंदी पुरस्काराने  सन्मान करण्यात येतो. डॉ. देशमुख यांनी निराधार, अंथरुणाला खिळलेले, परित्यक्ता, आजन्म ब्रह्मचारी असलेले, अर्धांगवायू, मानसिक आजाराने ग्रासित, दिव्यांग, परावलंबी लोकांसाठी आभाळमाया संस्थेची स्थापना केली. आतापर्यंत त्यांनी स्वत:च्या आणि इतर वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी दोन हजार मोफत शस्त्रक्रिया केल्या आहेत. 

आभाळमायातील वृद्धांची मोफत वैद्यकीय तपासणीही केली जाते. सध्या आभाळमायात १५ ते २० निराधार वृद्ध नि:शुल्क सांभाळले जातात. उत्सव काळात ट्रस्टतर्फे बारामती येथील जीवनसाधना फौंडेशन संचलित प्राजक्ता मतिमंद निवासी शाळेस मदत देण्यात येणार आहे. 

Web Title: Kolhapur News Maluli Anandi award to Dr. Aparna Deshmukh