#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात अंबाबाईला साकडे

मोहन मेस्त्री
मंगळवार, 31 जुलै 2018

कोल्हापूर - मराठा आरक्षण देण्यासाठी शासनाला सुबुद्धी यावी, यासाठी आज (मंगळवार) करवीरनिवासिनी अंबाबाईला जागर, गोंधळ व दंडवत घालण्यात आला. मराठा क्रांती संघटनेच्यावतीने याचे आयोजन केले होते.

कोल्हापूर - मराठा आरक्षण देण्यासाठी शासनाला सुबुद्धी यावी, यासाठी आज (मंगळवार) करवीरनिवासिनी अंबाबाईला जागर, गोंधळ व दंडवत घालण्यात आला. मराठा क्रांती संघटनेच्यावतीने याचे आयोजन केले होते.

मराठा क्रांती संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची याबाबत कागल येथे बैठक झाली होती. यामध्ये आरक्षणासाठी देवीला साकडे घालण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार उभा मारूती चाैकातून अंबाबाई मंदिरापर्यंत गोंधळ व जागर घालत मोर्चा काढण्यात आला. मोर्चा अंबाबाई मंदिरातील महाद्वारात पोहचल्यानंतर तेथे सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच तेथे देवीची आरती, जागर घालण्यात आला.

यावेळी वैशाली क्षीरसागर, माजी महापाैर सई खराडे, देवस्थान समिती सदस्या संगीता खाडे, जिजाऊ ब्रिगेड संघटनेने आरक्षणासाठी देवीला साकडे घातले. यावेळी सुरेश पाटील, राहुल इंगवले, राजू सावंत आदी उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Maratha reservation agitation