कोल्हापूर: निपाणीत जखमी झालेल्या वारकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जुलै 2017

मुरगूड (जि. कोल्हापूर) - पंढरपूरच्या दिशेने पायी दिंडीतून जात असताना निपाणी येथे मोटारीने धडक दिल्याने जखमी झालेल्या वारकऱ्याचा कोल्हापूरातील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

कुरकूली (ता. कागल) येथील वारकरी यशवंत पांडुरंग तिराळे (वय 58) यांना ओमणी गाडीने (क्र. MH 10 BM 4576) निपाणी येथे धडक दिली होती. त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या डोक्‍याला मार लागला होता. दरम्यान आज (गुरुवार) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार पिीरवार आहे.

Web Title: Kolhapur news marathi news sakal news warkari news