अध्यात्म व विज्ञानाची सांगड आवश्‍यक - डॉ. अपर्णा देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

कोल्हापूर -  विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग असले तरी आता या युगात अध्यात्माचीही सांगड आवश्‍यक आहे. आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी असून या वैद्यकशाखेकडेही लोक मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याचे मत ‘आभाळमाया’ संस्थेच्या डॉ. अपर्णा देशमुख यांनी व्यक्त केले. 

कोल्हापूर -  विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग असले तरी आता या युगात अध्यात्माचीही सांगड आवश्‍यक आहे. आयुर्वेद ही भारताने जगाला दिलेली सर्वश्रेष्ठ देणगी असून या वैद्यकशाखेकडेही लोक मोठ्या संख्येने आकर्षित होत असल्याचे मत ‘आभाळमाया’ संस्थेच्या डॉ. अपर्णा देशमुख यांनी व्यक्त केले.

येथील विश्‍वपंढरीत विश्‍वनाथ महाराज सांगवडेकर यांच्या ९९ व्या पुण्यस्मरण सोहळ्यात त्यांना माऊली आनंदी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते हा वितरण झाले. आनंदनाथ महाराज, श्‍यामला सांगवडेकर, रामराया सांगवडेकर, भावना सांगवडेकर, मंगलनाथ महाराज प्रमुख उपस्थित होते. 

डॉ. देशमुख मूळच्या पाचोरा (जि. जळगाव) येथील. त्यांचे वैद्यकीय शिक्षण पुण्यात झाले. त्यांनी आपली वैद्यकीय सेवा निराधार वृद्धांसाठी समर्पित केली आहे. 

प्रत्येक माणसाने माणसाला माणूस म्हणूनच वागणूक दिली पाहिजे; मात्र त्याच्याही पुढे जाऊन आपल्या आई-वडिलांचा सांभाळ केला पाहिजे. वृद्धाश्रमांची संख्या कमी करण्यासाठी प्रत्येकाचे योगदान आवश्‍यक आहे.

- डॉ. अपर्णा देशमुख

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘वृद्धाश्रमांची संख्या वाढणे आणि शासनाला ज्येष्ठांच्या सांभाळण्याविषयक कायदा करावा लागणे, या दुर्दैवी गोष्टी आहेत. या पार्श्‍वभूमीवर डॉ. देशमुख यांचे कार्य तरुणाईसाठी आदर्शवत आहे. 

दरम्यान, कार्यक्रमात सुपे (बारामती) येथील निर्मला व जयराम सुपेकर या मतिमंद मुलांची शाळा चालवणाऱ्या दाम्पत्याच्या कार्यासाठी मदत देण्यात आली. निरंजनदास सांगवडेकर यांनी स्वागत केले. डॉ. आनंद मानधने यांनी सूत्रसंचालन केले.  

५१ हजारांची मदत
डॉ. देशमुख यांच्या ‘आभाळमाया’ या प्रकल्पाला आमदार सतेज पाटील यांनी डॉ. डी. वाय. पाटील समूहातर्फे ५१ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली.

दरम्यान श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रूकडीकर पुण्यतिथी सोहळ्यात आयोजित श्री ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता आज झाली. या पारायण सोहळ्यामध्ये हजारो भाविकांनी भाग घेतला होता. पारायण तसेच उत्सवाच्या या सोहळ्यात राज्यभरातून भाविक येथे दाखल झाले आहेत. ध्यानधारणा, भजन, कीर्तन, प्रवचनांच्या या सोहळ्याने विश्वपंढरी भक्तीमय झाली आहे. उद्या श्री सद्गुरु मुनिंद्र विश्वनाथ महाराज रुकडीकर यांची पुण्यतिथी आहे. 

 

Web Title: Kolhapur News Mauli Anandi award to Aparna Deshmukh