मोबाईल चोरट्याची निवृत्त कर्मचाऱ्यास मारहाण

लुमाकांत नलवडे
मंगळवार, 13 मार्च 2018

कोल्हापूर - मोबाईल चोरट्याने मारहाण केल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी श्रीधर पांडुरंग पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. 

कोल्हापूर - मोबाईल चोरट्याने मारहाण केल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाटबंधारे विभागातील निवृत्त कर्मचारी श्रीधर पांडुरंग पवार हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीधर पवार हे मध्यवर्ती बसस्थानकातून बाहेर येत होते. या दरम्यान मोबाईल चोरट्याने त्यांचा मोबाईल चोरला. ही गोष्ट त्यांना लगेचच लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरडा केला. पण चोरट्याने त्यांना मारहाण करण्यात सुरवात केली. यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना तेथे असणाऱ्या वाहतूक पोलिसांसह फेरीवाल्यांच्या लक्षात आली. फेरीवाले संघटनेचे रघुनाथ कांबळे यांनी चोरट्याला पकडले. तसेच  वाहतूक पोलिसांनी चोरट्याकडून मोबाईल काढून घेतला. मोबाईल चोरट्यास ताब्यात घेऊन त्याला शाहुपुरी पोलिस ठाण्यामध्ये हजर केले आहे. 

Web Title: Kolhapur News Mobile theft incidence near CBS stand