इचलकरंजीच्या एस. बी. गॅंगला मोका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

इचलकरंजी - येथील कुख्यात गुंड एस. बी. ऊर्फ सुदर्शन बाबर (मूळ रा. दुसरी गल्ली, गणेशनगर सध्या रा. इंगवले हायस्कूलच्या मागे, हातकणंगले) याच्या टोळीवर आज मोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या कारवाईचा प्रस्ताव अवघ्या तीन दिवसांमध्ये तयार करून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

गुंड बाबर, त्याचे साथीदार राहुल ऊर्फ पांडू सदानंद माने, आकाश विद्याधर कांबळे (दोघे रा. इंदिरानगर, माळभाग, कोरोची) यांच्यावर मोकाखाली कारवाई करण्यात आली. अपर अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले पोलिस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डुबल यांनी प्रस्ताव तयार केला. तो जिल्हा अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे पाठविला. त्यांनी छाननी करून तो श्री. नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी आज सायंकाळी मंजुरी दिली. 

तिघेही सध्या कारागृहामध्ये आहेत. त्यांना इचलकरंजी-हातकणंगले रोडवरील भंडारे पेट्रोल पंपावरील राजू बाळासाहेब इनामदार (रा. तळंदगे फाटा, इंगळी वसाहत) यांना २९ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मोटारसायकलीमध्ये फुकटात पेट्रोल सोडण्यास सांगितले. त्यांनी नकार दिला. त्यावेळी त्यांनी त्यांच्या जवळचे ६५० रुपये लुटले होते.

बाबरविरोधात गंभीर गुन्हे टोळीचा म्होरक्‍या बाबरविरोधात दोन खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, जुगार, गर्दी करून मारामारी असे अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Kolhapur News Moka to S B Gang in Ichalkaraji