कोल्हापुरातील तरुणाचा दोघा मित्रांकडूनच खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

पेठवडगाव -  महिन्यापूर्वी तरुणाचा अपघातात झालेला मृत्यू हा अपघात नसून तो खून असल्याचे आज उघडकीस आले. दोघा मित्रांनीच पैशाच्या वादातूनच मित्राचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी रोहित राजेंद्र कोळी (वय २९, रा. मंगळवार पेठ, यल्लमादेवी मंदिरशेजारी, कोल्हापूर), सुमित राजेंद्र सावंत (वय २८, रा. भगतसिंग चौक, बुधवार पेठ, कोल्हापूर) यांच्यावर खुनाचा गुन्हा वडगाव पोलिसांत दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी, २८ नोव्हेंबर २०१७ला मृत निखिल सुरेश गायकवाड (वय २८, रा. शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर) मित्रासोबत सिनेमाला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी त्याचा वाठार येथील पुलाजवळ अपघात झाल्याचे व तो जखमी असल्याचे नातेवाइकांना पोलिसांनी कळवले. तो वाठार येथे बेशुद्धावस्थेत पडल्याचे निदर्शनास आल्याने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर बनल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघात होऊनही त्याला साधे खरचटलेही नव्हते. त्यामुळे त्याच्या अपघाताबाबत नातेवाइकांना शंका आली. पोलिसांनी व नातेवाइकांनी चौकशी केली असता त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळली. यामुळे त्याच्या मृत्यूबाबतचा संशय बळावला. निखिल मोटारसायकल चालवताना पडल्यामुळे जखमी झाल्याचे मित्रांनी सांगितले; परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो मोटारसायकल चालवत नसल्याचे निदर्शनास आले. त्याच्या दोघा मित्रांनी रोकड व सोन्याची चेन घेऊन त्याचा घातपात केल्याचे तपासात पुढे आले आहे. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, तपास पोलिस निरीक्षक यशवंत गवारी, सहायक पोलिस निरीक्षक गजानन देशमुख करीत आहेत.

Web Title: Kolhapur News murder from his friends