चंदेरी झगमगाटात नगरप्रदक्षिणा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

शहर विठुमय - अमाप उत्साहात आज होणार प्रतिपंढरपूर वारी
कोल्हापूर - ‘निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम...’ अशा अखंड गजरात आज येथील मिरजकर तिकटी विठ्ठल मंदिरात पारंपरिक उत्साहात नगरप्रदक्षिणा सोहळा झाला. यंदाच्या सोहळ्यात तेरा किलो चांदीच्या पालखीतून हा सोहळा झाल्याने त्याला चंदेरी झगमगाटही लाभला. 

भर पावसातही टाळ, मृदंग आणि विठ्ठल नामाच्या गजरात झालेल्या नगरप्रदक्षिणेमुळे वातावरण विठ्ठलमय झाले. दरम्यान, श्री ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा भक्त मंडळ, तसेच जय शिवराय फुटबॉल प्लेअर तरुण मंडळाने आयोजन केले. 

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. महापौर हसीना फरास, सदाभाऊ शिर्के, सचिन चव्हाण, पोलिस निरीक्षक निशिकांत भुजबळ, ॲड. राजेंद्र किंकर, संतोष कुलकर्णी, बाळासाहेब पोवार, दीपक गौड, किशोर घाटगे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. श्री विठ्ठल मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, जोतिबा रोड, भवानी मंडप, मिरजकर तिकटी, शाहू बॅंक, पाण्याचा खजिना, टिंबर मार्केट-सासने इस्टेट या मार्गावरून नगरप्रदक्षिणा निघाली. ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ असा जयघोष करत पालखी भवानी मंडपात आल्यानंतर तेथे वारकऱ्यांनी फुगडीचा फेर धरला. त्यानंतर पालखी मिरजकर तिकटीमार्गे टिंबर मार्केट परिसरातील सासने इस्टेटकडे मार्गस्थ झाली. श्रीमती शीलावती सासने यांच्या वतीने सासने इस्टेट येथे भोजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी सात ते रात्री आठ एम. पी. पाटील-कावणेकर यांचे, तर रात्री नऊ ते ११ या वेळेत हिरवडे दुमाला येथील आनंदराव लाड यांचे कीर्तन झाले. 

दरम्यान, उद्या (ता. ४) सकाळी सात वाजता मिरजकर तिकटी येथून प्रतिपंढरपूर वारीला प्रारंभ होणार आहे. खंडोबा तालीम येथे उभे रिंगण होणार आहे, तर पुईखडी येथे गोल रिंगण होणार आहे. यावेळी वारीत सुमारे शंभरहून अधिक गावांतील वारकरी सहभागी होणार आहेत.

एकादशीसाठी बाजारपेठ सज्ज
आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर बाजारपेठ सज्ज झाली आहे. उपवासाच्या पदार्थांची रेलचेल आहे. शहरातील मिरजकर तिकटीसह विठोबा (उत्तरेश्‍वर), विठ्ठल मंदिर (बुरूड गल्ली), अंबाबाई मंदिरातील विठ्ठल मंदिर, शनिवार मंडप, उत्तरेश्‍वर चौक विठ्ठल मंदिर आदी ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी अभिषेक, दुपारी पालखी सोहळा आणि रात्री भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतील. दरम्यान, शाळाशाळांत आज सकाळी बाल वारकऱ्यांच्या दिंड्या निघाल्या. त्यामुळे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येलाच आज दिवसभर विठुनामाचा गजर होत राहिला.

Web Title: kolhapur news nagarpradikshan in prati pandharpur