‘ई नाम’ बाजारात सौद्यांचे पैसे तत्काळ

शिवाजी यादव
रविवार, 27 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - शेतीमाल बाजारपेठेत आणला की, इथल्याच व्यापाऱ्यांनी तो खरेदी करायचा त्यामुळे ते देतील तेवढाच दर घेऊन शेतकऱ्याने गप्प परत जायचे, असा प्रकार फक्त कोल्हापुरात नव्हे तर देशातील बाजार समितीत सुरू आहे. त्याला छेद देण्यासाठी ई नाम अर्थात राष्ट्रीय बाजाराची संकल्पना (ऑनलाईन) केंद्र सरकारने आणली आहे. त्यात देशातील कोल्हापूरसह ३० मोठ्या बाजारपेठा जोडल्या असून, त्यातून कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल देशातील विविध बाजारपेठांतील व्यापाऱ्यांना खरेदी करता येणार आहे. चांगल्या मालाला चांगला भाव व त्वरित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत.

कोल्हापूर - शेतीमाल बाजारपेठेत आणला की, इथल्याच व्यापाऱ्यांनी तो खरेदी करायचा त्यामुळे ते देतील तेवढाच दर घेऊन शेतकऱ्याने गप्प परत जायचे, असा प्रकार फक्त कोल्हापुरात नव्हे तर देशातील बाजार समितीत सुरू आहे. त्याला छेद देण्यासाठी ई नाम अर्थात राष्ट्रीय बाजाराची संकल्पना (ऑनलाईन) केंद्र सरकारने आणली आहे. त्यात देशातील कोल्हापूरसह ३० मोठ्या बाजारपेठा जोडल्या असून, त्यातून कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा शेतीमाल देशातील विविध बाजारपेठांतील व्यापाऱ्यांना खरेदी करता येणार आहे. चांगल्या मालाला चांगला भाव व त्वरित पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. हेच या बाजाराचे वैशिष्ट्य शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे.

ई नाम बाजारपेठेचे बहुतेक सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने होतील. त्यात तांत्रिक बाबी आहेत, त्यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी बाजार समितीस्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. बहुतांशी शेतकरी सध्या बाजारपेठेत माल घेऊन येतात व सौद्याला लावतात. गुळाचे सौद्ये झाल्यानंतर दोन महिन्याने पैसे मिळतात अशी स्थिती आहे. 

या शिवाय खरेदी करणारा स्थानिक व्यापारी असल्याने शेतकऱ्यांशी त्याचे संबंध प्रस्थापित झालेले असतात. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांच्या विक्री केलेल्या मालाचे पैसे तातडीने द्यावेत, असा तगादा शेतकऱ्याला लावता येणेही मुश्‍कील होते. नव्या ई नाम ऑनलाईन सौदे व्यवहारात शेतकऱ्यांना तातडीने पैसे मिळणार आहेत. 

ई नाम व्यवहारासाठी शेतकऱ्यांना बाजार समितीकडे नोंदणी करावी लागेल. त्याने आणलेल्या शेतीमालाला बाजार समितीच्या प्रवेशव्दारावरच संगणकावर फोटो काढण्यात येतील. व्हिडिओ येईल तो ऑनलाईन बाजाराला जोडलेला असेल. त्यानंतर देशातील जे व्यापारी ई नाम बाजारासाठी जोडलेला आहे त्यांना हा शेतीमाल ऑनलाईन पाहता येईल. त्याचे दर ते ऑनलाईन टाकतील तो दर इथल्या शेतकऱ्याला पसंत पडल्यास शेतकऱ्याला आपला माल संबंधित व्यापाऱ्याला विकता येईल. त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. 

ई नामची वैशिष्ट्ये 
ई नाम व्यापारासाठी नोंद असलेल्या ३० बाजार समित्या तंत्रज्ञानाने जोडल्या आहेत.
यात नोंदणीकृत व्यापाऱ्यांची हमी घेऊनच नोंद केलेली आहे
कोणी पैसे दिले नाहीत तर त्याबाबत बाजार समितीत दाद मागता येते. 
ऑनलाईन तक्रार नोंदविण्याची सुविधा शेतकऱ्यांकडे आहे.  

कोल्हापूर बाजारातील वार्षिक उलाढाल
भाजीपाला खरेदी-विक्री उलाढाल १५० ते १८० कोटी 
कांदा-बटाटा खरेदी विक्री उलाढाल १६० ते २०० कोटी
गूळ खरेदी विक्री उलाढाल २५० ते २७० कोटी    
एकूण जोडलेले शेतकरी ३० ते ४० हजार

Web Title: kolhapur news National Market