नवमतदारांच्या नोंदणीसाठी १ ते ३१ जुलैपर्यंत मोहीम - संजय शिंदे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

१८ वर्षे पूर्ण झालेल्या ६२ टक्के तरुणांची नोंदणीच नाही 

कोल्हापूर - जिल्ह्यात वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले ६२ टक्के तरुण मतदारच नाहीत. १८ ते १९ या वयोगटातील केवळ ३८ टक्के तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. या तरुणांची प्रथम मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी १ ते ३१ जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. शिंदे म्हणाले, २०१५ मध्ये १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांची जिल्ह्यातील लोकसंख्या १ लाख २४ हजार आहे. यापैकी फक्त ४७ हजार ३१७ तरूणांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे. हे प्रमाण ३८ टक्के आहे, अजूनही ६२ टक्के या वयोगटातील तरूणांची मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने १८ ते २१ वयोगटातील मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी १ जुलैपासन विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत.’ ते म्हणाले,‘५ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकावर मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. यात जिल्ह्यात एकूण २९ लाख ३६ हजार ५४९ आहे. 

यापैकी १५ लाख १९ हजार ५१९ पुरूष,  १४ लाख १६ हजार ९६५ महिला मतदारांचा समावेश आहे. ८ व  २२ जुलै या दोन दिवशी विशेष मोहिमेद्वारे १८ ते २१ वयोगटातील मतदार नोंदणी प्रत्येक मतदान केंद्रावर होणार आहे. या शिवाय इतर दिवशी महाविद्यालयातही या मतदार नोंदणीची मोहीम राबवण्यात येणार आहे.’ श्री. शिंदे म्हणाले,‘मतदार यादीत नांव नोंदवण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांची महाविद्यालयात प्रवेश घेतानाच प्रवेशपत्रासोबत मतदार यादीत नांव समाविष्ट करण्यासाठी आवश्‍यक तो फॉर्म भरून घेतला जाईल. या कार्यक्रमाबरोबरच मयत मतदारांची नांवेही यादीतून कमी करण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.’
 
१ जुलै राज्य मतदार दिवस
राज्य शासनाने २० मे २०१७ च्या आदेशान्वये राष्ट्रीय मतदार दिनाच्या धर्तीवर राज्यात १ जुलै हा राज्य मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर प्रांताधिकारी तर तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या स्तरावर राज्य मतदार दिवस साजरा करण्यात येणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

Web Title: kolhapur news new voter registration campaign