क्रीडाप्रबोधिनीत रेक्‍टर ना शिपाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - ‘ना रेक्‍टर, ना शिपाई’, ही स्थिती जिल्हा क्रीडा कार्यालयातील क्रीडाप्रबोधिनीची आहे. पाच वर्षांपूर्वी २७ खेळाडू असणाऱ्या क्रीडाप्रबोधिनीतील खेळाडूंचा आकडा घटला असून, तो आता १४ झाला आहे. निवासी नेमबाज नवनाथ फरताडे, संदीप तरटे, फुलचंद बांगर वगळता अन्य कोणत्याही निवासी खेळाडूने आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक मिळविलेले नाही. तूर्त केवळ अनिवासी खेळाडूंच्या यशावरच क्रीडाप्रबोधिनीचा गाजावाजा होत आहे. 

जिल्हा क्रीडा कार्यालयात क्रीडाप्रबोधिनीची १९९७ ला स्थापना झाली. प्रबोधिनीसाठी स्वतंत्र प्राचार्यांची नियुक्ती केली गेली. प्रबोधिनीसाठी एक स्वतंत्र चारचाकी, प्रत्येकी एक शिपाई, रेक्‍टर व क्‍लार्कही नेमला गेला. दहा वर्षांपूर्वी प्रबोधिनी ही खेळाडूंनी गजबजलेली होती. 

प्रबोधिनीतच खेळाडूंची राहण्याची व्यवस्था असल्याने त्यांच्यावर देखरेखीसाठी रेक्‍टर होता. एखाद्या नेमबाजाने पदक मिळविले, की त्यांच्या विजयाचा जल्लोष आतषबाजीत व्हायचा. नवनाथच्या विजयाचा आनंदोत्सव याच प्रबोधिनीने अनुभवला. मात्र, ती स्थिती आता राहिलेली नाही. 

प्रबोधिनीतील खेळाडूंची संख्या घटत आहे. येथील रेक्‍टरची दोन वर्षांपूर्वी अमरावतीला मुख्य लिपिक म्हणून, तर शिपायाची सांगलीला बदली झाली आहे. प्रबोधिनीची चारचाकी नादुरुस्त झाल्याने तेथील ड्रायव्हरची बदली पुण्याच्या बालेवाडीत करण्यात आली आहे. केवळ क्‍लार्कच्या उपस्थितीवरच प्रबोधिनी सुरू आहे. विशेष म्हणजे गेली ३९ महिने विना वेतन तो काम करतो आहे. आता तोच रेक्‍टर, तोच क्‍लार्क आणि तोच शिपाई, अशी स्थिती आहे.

Web Title: kolhapur news no rector no peon in sports academy