‘नो शेव्ह नोव्हेंबर’ची यंदाही धूम..!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - जगभरात आता ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ची धूम सुरू होणार आहे, आणि येथील काही सलून व्यावसायिकांनीही त्याची जय्यत तयारी केली आहे. गेल्या वर्षीपासून येथे हा ट्रेंड रुजला आहे. वाढलेल्या दाढी आणि मिशांसाठी सलून व्यावसायिकांनी आठ ते नऊ प्रकारच्या विविध स्टाइल्स उपलब्ध केल्या आहेत.

कोल्हापूर - जगभरात आता ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ची धूम सुरू होणार आहे, आणि येथील काही सलून व्यावसायिकांनीही त्याची जय्यत तयारी केली आहे. गेल्या वर्षीपासून येथे हा ट्रेंड रुजला आहे. वाढलेल्या दाढी आणि मिशांसाठी सलून व्यावसायिकांनी आठ ते नऊ प्रकारच्या विविध स्टाइल्स उपलब्ध केल्या आहेत. दरम्यान, बुधवार (ता. १)पासून नोव्हेंबरला प्रारंभ होत असला तरी चार-पाच दिवसांनी अशा स्टाईल्सचे फोटो सोशल मीडियावरून शेअर होणार आहेत. 

आरोग्य आणि प्रोस्टेट कॅन्सर याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जगभरात पाच वर्षांपासून ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ ही संकल्पना रुजली. कॅन्सरग्रस्तांवर उपचारांदरम्यान केस गळण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या महिन्यात दाढी न करता किंवा केस न कापता त्यावर खर्च होणारे पैसे कॅन्सरग्रस्तांच्या  मदतीसाठी देणे, अशी ही संकल्पना आहे. 

वळणदार, झुपकेदार मिशांची स्टाईल ही तशी कोल्हापूरला नवीन नाही. गेल्या काही वर्षांत विविध सेलिब्रिटींचे अनुकरण करीत ‘चकाचक दाढी-मिशा’ ही क्रेझही वाढली, मात्र सोशल मीडियावरून ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ कॅम्पेनने जोर धरला आणि गेल्या वर्षी दाढी-मिशांच्या विविध स्टाईल्स, आकर्षक रंगांचा त्यासाठी वापर आणि त्यासाठीच्या विविध संकल्पना मोठ्या प्रमाणात पुढे आल्या. 

अनेक तरुणांनी चक्क महिनाभर दाढी-मिशा ठेवल्या. महाराजा शेव्हिंग कट, मस्केटियर लुक, सोल पॅच, ‘बाजीराव-मस्तानी’मधील रणवीरसिंगची मिशांची स्टाइल आणि वाइल्ड वेस्ट स्टाईल हे ट्रेंडस्‌ कोल्हापुरातही अनुभवायला मिळाले. त्याशिवाय, नव्या लुकला सूट होणारी हेअर स्टाईलही करून घेण्यावर अनेकांनी भर दिला होता. यंदा आणखी काही स्टाईल्स नव्याने नक्कीच येणार आहेत.

सोशल मीडियामुळे आता नोव्हेंबरमध्ये येथील तरुणाईत दाढी-मिशा वाढविण्याची क्रेझ वाढली आहे; पण ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ची मूळ संकल्पना अनेकांना अजूनही माहिती नाही. ट्रेंडी तरुणाईसाठी मात्र आम्ही अनेक स्टाईल्स उपलब्ध केल्या आहेत आणि यंदा काही रक्कम कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठीही देणार आहोत. 
- धनंजय व युवराज भालेकर, हेअर अफेअर सलून

Web Title: Kolhapur News No Shave November movement