चेन्नई येथे पन्नास कोटींची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपीस अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कोल्हापूर - चेन्नई येथे पन्नास कोटी रुपयांची फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. एस. व्यंकटरामन श्रीरंगराजन (वय ५७, रा. चेन्नई,) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कोल्हापूर - चेन्नई येथे पन्नास कोटी रुपयांची फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली. एस. व्यंकटरामन श्रीरंगराजन (वय ५७, रा. चेन्नई,) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पंचतारांकित औद्योगिक वसाहत येथे ही कारवाई करण्यात आली. चेन्नई पोलिसांना गोकुळ शिरगाव आणि गांधीनगर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
पोलिसांनी सांगितले, की  श्रीरंगराजन (रा.१-१३६, ए कामराज स्ट्रीट केलंबक्कम,चेन्नई) याने लोकांना जमीन देतो, असे सांगून लोकांकडून पैसे घेतले. लेखी करार केले, तरीही ती जमीन तिसऱ्यांनाच विक्री करून सुमारे पन्नास कोटींची फसवणूक केल्याबद्दल त्याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल झाले. चेन्नई सेंट्रल क्राईम ब्रॅंचकडे हे गुन्हे दाखल झाल्यावर तो गेली दोन वर्षे फरार झाला होता.

त्याचा शोध घेण्यासाठी चेन्नई क्राईम ब्रॅंचचे असिस्टंट कमिशन ऑफ पोलिस मुथुवेल पांडे, पोलिस निरीक्षक आनंद बाबू यांच्यासह त्यांची टीम कोल्हापुरात आली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे, गांधीनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी तपासाच्या सूचना दिल्या होत्या. तीन दिवसांपासून संबंधित श्रीरंगराजन यांची माहिती मिळवून त्यांच्यावर वॉच ठेवला. त्याला फाईव्ह स्टार एमआयडीसीतील सिल्व्हर झोन परिसरातून अटक केली. त्यांना चेन्नई पोलिस घेऊन गेले. कारवाईत पोलिस  कॉन्स्टेबल विशाल खराडे, अमित सुळगावकर, मोहन गवळी, चेन्नईच्या पथकाने ही कारवाई केली होती.

चेन्नई पोलिसांनी तेथे घेतलेल्या माहितीनुसार श्रीरंगराजन हा कोल्हापुरात असल्याची माहिती मिळाली होती. त्याचे वास्तव्य हुपरी-पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात असल्याचे संदर्भ मिळाले होते. त्यामुळे चेन्नई पोलिसांनी पोलिस अधीक्षकांना भेटून याची माहिती दिली. गोकुळ शिरगाव आणि गांधीनगर पोलिस ठाण्याच्या मदतीने त्यांनी ही कारवाई करून त्याला अटक केली.

Web Title: Kolhapur News one arrested in 50 cores fraud case