कोल्हापूरात अपघातात सराफ व्यावसायिक ठार 

राजेश मोरे
रविवार, 24 जून 2018

कोल्हापूर - मंगळवार पेठ बेलबाग येथे आज सकाळी हौदा टेंपो व मोपेडची समोरासमोर धडक झाली. यात मोपेडस्वार सराफ व्यावसायिक ठार झाला. प्रवीण भोपालचंद राठोड (वय 35, रा. पूर्णपवित्र सोसायटी, बेलबाग, मंगळवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. 

कोल्हापूर - मंगळवार पेठ बेलबाग येथे आज सकाळी हौदा टेंपो व मोपेडची समोरासमोर धडक झाली. यात मोपेडस्वार सराफ व्यावसायिक ठार झाला. प्रवीण भोपालचंद राठोड (वय 35, रा. पूर्णपवित्र सोसायटी, बेलबाग, मंगळवार पेठ) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, मंगळवार पेठ बेलबाग येथील पूर्णपवित्र सोसायटीत प्रवीण राठोड कुटुंबासोबत राहत होते. त्यांचा भेंडे गल्लीत सराफ व्यवसाय आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास ते मोपेडवरून दुकानाकडे जात होते. दरम्यान शाहरूख अन्वर शेख (वय 23, रा. राजोपाध्येनगर) हे स्क्रॅप व्यवसायिक आपला हौदा टेंपो घेऊन बेलबाग मार्गे गोखले कॉलेजच्या दिशेने जात होते. येथील आईस फ्रॅक्‍टरीच्या दारात राठोड यांच्या मोपेडची व शेख यांच्या हौदा टेंपोची समोरासमोर धडक झाली. यात मोपेडस्वार राठोड हे सात ते आठ फूटावर जावून पडले. यात त्यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्यांना शेख यांनी तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले. 

या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह सराफ व्यावसायिकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राठोड यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई-वडील असा परिवार आहे. 

वाहने पार्किंगचे ठिकाण... 
बेलबागेतील रस्ता हा आकाराने रूंद आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग नेहमी असते. त्यामुळे हा रस्ता अतिशय अरूंद बनला आहे. रहदारीचे प्रमाण कमी असल्याने वाहनचालक सुसाट असतात. परिणामी येथे दररोज लहान मोठे अपघात घडत असतात. शहर वाहतूक पोलिसांनी बेशिस्त पार्किंगवर तातडीने करावाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत होते. 

Web Title: Kolhapur News one dead in an Accident in Belbag region