परभणीची महिला जोतिबा रोडवर मोटार अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

कोल्हापूर - जोतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या परभणीच्या भाविकांच्या गाडीला रेडेडोहजवळ अपघात झाला. आज सकाळी झालेल्या या अपघातामध्ये एक महिला भाविक जागीच ठार झाली. तर 13 भाविक जखमी झाले आहे.  सुरेखा गोविंदराव सातपुते (वय 25, रा. असोला, ता. परभणी) असे त्या मृत महिलेचे नाव आहे.

कोल्हापूर - जोतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या परभणीच्या भाविकांच्या गाडीला रेडेडोहजवळ अपघात झाला. आज सकाळी झालेल्या या अपघातामध्ये एक महिला भाविक जागीच ठार झाली. तर 13 भाविक जखमी झाले आहे.  सुरेखा गोविंदराव सातपुते (वय 25, रा. असोला, ता. परभणी) असे त्या मृत महिलेचे नाव आहे.

जखमींवर सीपीआर व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात सुरू होते.  या अपघातामधील अन्य जखमींची नांवे अशी - सोनबा कमळाजी तिडके (वय 50), शांताबाई सोनबा तिडके (वय 40), रामेश्‍वर सोनबा तिडके (वय 21), कार्तिकी लिंबाजी तिडके (वय 5), श्रावणी लिंबाजी तिडके (वय 2, सर्व रा. पोखाडी, ता. परभणी). समर्थ गोविंदराव सातपुते (8 महिने, रा. मसोला, ता. परभणी), अशोक नामदेव बोबडे (वय 22, रा. दामपुरी, परभणी), गयाबाई रानबा ढापसे (वय 60, रा. पोरवड, परभणी), सुरेखा लिंबाजी तिडके (वय 30), लिंबाजी संभाजी तिडके (वय 35), रानबा सुनबा ढापसे (वय 68), प्रसाद ज्ञानेश्‍वर बालटकर (वय 18, सर्व रा. पोरवाड, परभणी) आणि सुदाम रंगराव पाटील (वय 24, रा. कोगे, ता. करवीर) अशी आहेत. 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी परभणी येथील तिडके कुटुंबीय व त्यांचे नातेवाईक गांधीनगर येथे कामानिमित्त स्थायीक झाले आहेत. काल जोतीबा दर्शनासाठी तिडके परिवार व त्यांचे नातेवाईक दुपारी रेल्वेने गांधीनगर येथे आले. आज सकाळी त्यांनी कोगे (ता. करवीर) येथील एक खासगी मोटार भाड्याने ठरवली. त्यातून आज सकाळी साडेसातच्या सुमारास ते जोतिबा दर्शनासाठी निघाले. गांधीनगरहून शिवाजी पुल, आंबेवाडी मार्गे जोतिबा मंदिराकडे जात असताना रेडेडोहजवळ चालकाचा ताबा सुटला व मोटार रस्त्याच्या उजव्या बाजूला सुमारे 7 ते 8 फूट खोल कोसळली. त्यात चालक सुदाम पाटीलसह 14 जण गंभीर जखमी झाले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच करवीर पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप जाधव यांनी घटनास्थळी व सीपीआरला भेट दिली. इतर जखमींची प्रकृती स्थिर आहे. याबाबत चालक सुद्दाम पाटील यांने भरधाव मोटार चालवून अपघात केल्याप्रकरणी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सांगितले. 

माय लेकाची झाली ताटातूट  
मोटारीच्या पाठीमागील सिटवर सुरेखा सातपुते आठ महिन्याचा मुलगा समर याला मांडीवर घेवून बसल्या होत्या. मोटार रस्त्याकडेला असणाऱ्या सात ते आठ फूट खाली खड्डयात पडून दोनवेळा उलटली. यात मोटारीचा वरील टपचा चुराडा झाला. त्यात सुरेखा सातपुते यांच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. उपचारापूर्वीच त्यांचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला. सुर्देवाने त्यांच्या मांडीवर बसलेल्या समर्थला किरकोळ दुखापत झाली. मात्र रुग्णालयात त्याचे डोळे आईला शोधत होते. अपघातात आईला पोरका झालेल्या समर्थला पाहून जखमी नातेवाईक आक्रोश करत होते.

Web Title: Kolhapur News one dead in an accident on Jotiba Road