ऑन लाईन लॉटरीवर ही कारवाई करा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी सेंटरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधिकाऱ्यांना दिले. सरकारमान्य क्‍लबमध्ये नेमके काय चालते, याचीही माहिती घ्या. गुंडा पथकाची तातडीने नेमणूक करा अशाही सूचना त्यानी अधिकाऱ्यांना दिल्या. 

कोल्हापूर - बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी सेंटरवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी अधिकाऱ्यांना दिले. सरकारमान्य क्‍लबमध्ये नेमके काय चालते, याचीही माहिती घ्या. गुंडा पथकाची तातडीने नेमणूक करा अशाही सूचना त्यानी अधिकाऱ्यांना दिल्या. 

मोहिते म्हणाले, ""मशिनमध्ये फेरफार करून जुगाराचा खेळ चालविणाऱ्या व्हिडिओ पार्लरवर नुकतीच पोलिस अधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी कारवाई केली. अशाच पद्धतीची कारवाई जिल्ह्यात येथून पुढे सुरू ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर सध्या जिल्ह्यात ऑनलाइन लॉटरी सेंटरच्या आधारे जुगार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. बेकादेशीर ऑनलाइन लॉटरी सेंटरवर तातडीने छापे टाकून कारवाई केली जाणार आहे. असे अवैध धंदे सुरू ठेवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्याचबरोबर शहर व परिसरात सरकारमान्य क्‍लबमध्ये नेमके काय चाललेले असते, त्याचा गैरवापर केला जातो का, याचीही तपासणी पोलिसांकडून केली जाणार आहे. त्याबाबतचे आदेशही पोलिस उपअधीक्षकांना देण्यात आले आहेत. शहरात गुंडगिरी वाढू नये, यासाठी गुंडा पथक कार्यरत होते; मात्र हे पथक कालांतराने बंद झाले; मात्र फक्त गुंडांवर वचक ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात अशी पथके नेमण्याचे आदेश पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहेत. या पथकांकडून खास करून कोल्हापूर व इचलकरंजीवर विशेष लक्ष दिले जाईल. 

टीप देणाऱ्याचा शोध घ्या 
व्हिडिओ पार्लरवर छापे टाकताना अनेक पार्लर अचानक बंद झाली. याची टीप कोणी दिली, याचा शोध घ्या. त्याचबरोबर त्या पार्लरचीही तातडीने तपासणी करा असे आदेश आज पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांना दिले.

Web Title: kolhapur news online lottery