आफ्रिकेतील रवांडात भारतीय उद्योजकांना मोठी संधी - मनीष गुप्ता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  ‘‘आफ्रिकेतील रवांडा येथे पायाभूत सुविधांपासून उत्पादन क्षेत्राची कमतरता आहे, भविष्यात भारतीय उद्योजकांना गुंतवणुकीपासून उत्पादन निर्मितीसाठी मोठी संधी आहे. त्यासाठी रवांडा सरकार आर्थिक पाठबळ देण्याबरोबर विविध करसवलतींही देणार आहे, त्यामुळे स्थानिक उद्योजकांना रवांडामध्ये उद्योग उभारणीला मोठा वाव आहे, असे मत उद्योग, व्यापार, कौशल्य क्षेत्राचे अभ्यासक मनीष गुप्ता यांनी येथे व्यक्त केले.

कोल्हापूर -  ‘‘आफ्रिकेतील रवांडा येथे पायाभूत सुविधांपासून उत्पादन क्षेत्राची कमतरता आहे, भविष्यात भारतीय उद्योजकांना गुंतवणुकीपासून उत्पादन निर्मितीसाठी मोठी संधी आहे. त्यासाठी रवांडा सरकार आर्थिक पाठबळ देण्याबरोबर विविध करसवलतींही देणार आहे, त्यामुळे स्थानिक उद्योजकांना रवांडामध्ये उद्योग उभारणीला मोठा वाव आहे, असे मत उद्योग, व्यापार, कौशल्य क्षेत्राचे अभ्यासक मनीष गुप्ता यांनी येथे व्यक्त केले.

कोल्हापूर कॉलिंगतर्फे उद्योजक पारस ओसवाल यांच्या पुढाकाराने स्थानिक उद्योजकांना ‘परदेशांत उद्योग विस्ताराच्या संधी’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. गुप्ता यांनीही माहिती दिली.

श्री. गुप्ता म्हणाले की, ‘‘परंपरागत उद्योगाबरोबर अाधुनिक काळाशी सुसंगत उद्योग उभारणी कोल्हापुरात जास्त चांगल्या प्रकारे तग धरून आहे, मात्र विविध देशांत आलेल्या औद्योगिक मंदीमुळे अपेक्षित नफा अथवा उत्पादनात घट झाली हेही वास्तव आहे, अशा स्थितीत आफ्रिक्रेत रवांडा भागात मात्र बहुतेकस्तरावर उद्योगाची वाणवा आहे. स्थानिक उद्योजकांना तिथे रोजगार उभारण्यासाठी जागेपासून ग्राहकांच्या मागणीपर्यंत सर्व सुविधा आहेत. त्यामुळे इथे मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेने जास्त उत्पन्न तुम्हाला मिळू शकते.’’ 

ते पुढे म्हणाले की, ‘‘रवांडामध्ये इंग्रजी भाषा चालते. तसेच रंवाडा सरकार तेथे भारतीय उद्योगांना त्यांच्या उत्पादन प्रक्रियेसाठी पूरक सुविधा देण्यास तयार आहे. यात अार्थिक गुंतवणूक करा. सवलतीत वीज, रस्ते, पाणी यांसह विविध सुविधा देण्यात येणार आहेत. यात सर्वाधिक गरज कृषी उत्पादनावरील प्रक्रिया उद्योगाची आहे, त्याच बरोबर बांधकाम, पायाभूत सुविधा, आरोग्य शिक्षण यांबरोबर डेअरी उद्योग अशा व्यवसायांना मोठा वाव आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘कोल्हापुरात कृषीपूरक उत्पादन ते पारंपरिक उद्योग जास्त संख्येने आहेत. इचलकरंजीत टेक्‍सटाईल उद्योग आहे, याशिवाय व्यक्तिगत स्तरावर कारागिरीचे कौशल्य ज्यांच्याकडे आहे, त्यांना एखादे लहान-मोठे उत्पादन घेण्याची क्षमता आहे, अशा कारागिरांना तेथे स्वतःचा उद्योग किंवा आपल्याकडे असलेल्या कौशल्याच्या आधारे उत्पादन घेण्याचे प्रशिक्षण इन्स्टिट्यूटही सुरू करता येऊ शकते. त्यामुळे ज्यांच्याकडे कौशल्य आहे, त्याला रवांडात संधी आहे, अशा संधीचा लाभ घेतल्यास भविष्य उज्ज्वल बनवता येणार आहे.’’ तरी याबाबत इच्छुकांना कोल्हापूर कॉलिंगतर्फे मार्गदर्शन करण्यात येत असून इच्छुकांनी संपर्क साधवा, असे आवाहन के. के. बिरनाळे यांनी केले.

Web Title: kolhapur news opportunities for Indian entrepreneurs in Rwanda