शेतकऱ्यांसाठी दिल्लीत विशेष अधिवेशन घ्या - पी. साईनाथ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

सिद्धनेर्ली - ‘तुमच्या विविध प्रश्‍नांसाठी दहा लाख शेतकऱ्यांनिशी दिल्लीला धडक द्या, संसदेला घेराव घालून वीस दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावयास लावून, सरकारच्या छाताडावर बसून मागण्या मान्य करून घ्या, असे परखड आवाहन मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले.

सिद्धनेर्ली - ‘तुमच्या विविध प्रश्‍नांसाठी दहा लाख शेतकऱ्यांनिशी दिल्लीला धडक द्या, संसदेला घेराव घालून वीस दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावयास लावून, सरकारच्या छाताडावर बसून मागण्या मान्य करून घ्या, असे परखड आवाहन मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले.

‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ हे येथे  कॉम्रेड संतराम पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व कॉम्रेड गणपती ईश्‍वरा पाटील वाढदिवस गौरव समितीच्या निमंत्रणावरून येथे आले होते.

श्री. साईनाथ यांचे भारतातील हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर स्वतंत्र डाॅक्‍युमेंटरी करण्याचे काम सुरू आहे. श्री. पाटील यांचीही त्यासाठी त्यांनी माहिती घेतली. पाणीप्रश्‍न, स्वातंत्र्य चळवळ, सीमा लढा यासह डाव्या चळवळीतील आठवणी यासह विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली.
श्री. साईनाथ यांचा ग्रामस्थांतर्फे सरपंच नीता पाटील यांनी, तसेच पंडित कोईगडे यांच्यासह सर्व पत्रकारांनी पुस्तक भेट देऊन सत्कार केला. 

अजित पाटील, शेखर सावंत, यशवंत पाटील, सुनील मगदूम, विलास पोवार, किसन मेटील, सदाशिव निकम, शिवाजी मगदूम, सुवर्णा तळेकर, एम. बी. पाटील, आनंदराव पाटील आदी उपस्थित होते. 

मीडिया हताश जनता हतबल 
हतबल मीडिया हताश माणस लाखोंच्या संख्येने पोटतिडकेने शेतकरी मागण्यांसाठी सरकारविरोधात मोर्चे काढतात. शासनकर्ते त्यांची थट्टा हे खरे शेतकरी नाहीत, अशी करतात, तर पी टी आयसारखे क्राईमचा प्रतिनिधी या मोर्चाच्या वार्तांकनासाठी पाठवितात. शेतीतील गंधही नसणारा काय लिहिणार? असा प्रश्‍न  उपस्थित करून जनताही निमुटपणे हे सारे पाहते, असे सांगत साईनाथ यांनी मीडिया हताश असून, जनता हतबल झाल्याचे सत्य मांडले.

...अन्यथा पाण्यासाठी संघर्ष 
ते म्हणाले, ‘‘भारत जगातील एकमेव देश आहे, जिथे नद्यांचे एकीकडे राष्ट्रीयीकरण तर दुसरीकडे पाण्याचे मात्र विविध अभ्यास प्रयोगांच्या गोंडस नावाखाली खासगीकरण केले जाते. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर सरकारी वरदहस्ताने शहरी भारतीय अतिक्रमण करत आहेत. टंचाईग्रस्त भागात माता-भगिनी पन्नास पैशापासून एक रुपये दराने पाणी विकत घेतात. त्याच भागात बीअरच्या कारखान्यांसाठी एक पैसा प्रति लिटर दराने तीस वर्षांच्या कराराने सरकार पाणी पुरविते. औद्योगिक वापरासाठीही पिण्याच्या व शेतीसाठीच्या वापरातीलच पाणी वळवले जाते. ही विषमता थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनीच पाणीदार होऊन पाणी वाचविले पाहिजे. अन्यथा पाण्यासाठी संघर्ष अटळ आहे.

Web Title: Kolhapur News P Sainath Comment