पाडळी निनाम सासनकाठीचा जोतिबाकडे प्रवास सुरू...

सुधाकर काशीद
बुधवार, 28 मार्च 2018

कोल्हापूर - वाडी रत्नागिरी येथील जोतिबा यात्रेतील पाडळी निनाम येथील मुख्य मानाच्या सासनकाठीचा मानाचा प्रवास उद्या पहाटे सुरू होत आहे. सातारा जिल्ह्यातील पाडळी निनामची ही सासनकाठी आणि या सासनकाठीची पारंपरिक थाटामाटात निघणारी मिरवणूक यात्रेचे एक वेगळे वैशिष्ट मानले जाते. काल रात्री सासनकाठीपूर्वी गावातून खास यात्रेसाठी सजलेल्या बैलगाड्यांचा ताफा वाजत-गाजत बाहेर पडला.

जोतिबा यात्रेत सासनकाठीच्या मिरवणुकीची पारंपरिक प्रथा आहे. किंबहुना ही मिरवणूक त्यापाठोपाठ पालखी व या मिरवणुकीवर गुलाल खोबऱ्याची होणारी उधळण हा यात्रेचा केंद्रबिंदू मानला जातो. या वेळी होणाऱ्या गुलालाच्या उधळणीमुळे सारा आसमंत गुलाबी होऊन जातो. या मिरवणुकीत गावोगावाहून आलेल्या सासनकाठ्या घेऊन भाविक सहभागी होतात. पारंपरिक मानानुसार या काठ्यांना मिरवणुकीत प्रवेश मिळतो. त्यात पाहिला मान पाडळी निनाम या गावच्या सासनकाठीला असतो. 

अर्थात यामुळेच गावातला आणि त्या परिसरातला घरटी एक माणूस सासनकाठीच्या मिरवणुकीत सहभागी होतो. सासनकाठी म्हणजे उंच बांबू. या बांबूवर ध्वज असतो. बांबू रेशमी कापड, गोंडे व झालरीने  सजवलेला असतो. त्याला लाख रुपये खर्च केला जातात. ही सजवलेली ४५ फूट पंच सासनकाठी उभी खांद्यावर घेऊन नाचवली जाते. उंच काठीचा तोल जाऊ नये, म्हणून चार बाजूंनी दोरी बांधलेली असते. हलगी, पिपाणी, घुमके व झांजाच्या तालात ही काठी देहभान हरपून नाचवली जाते. या वेळी भाविकांकडून गुलालाची उधळण होते. सासनकाठीला पहिला मान असल्याने ही काठी.

निनाम पाडळीच्या काठीसोबत हजारांवर ग्रामस्थ असतात. सर्वांच्या डोक्‍यावर पांढरी टोपी असते. एकाच्याही पायात चप्पल नसते. घामाने चिंब झालेल्या या सर्वांच्या अंगावर गुलालाची अक्षरशः शिग असते. घामाची धारही गुलाबी रंगात वाहत असते. मानाच्या या सासनकाठीचा संपूर्ण प्रवास पायी होतो, उद्या पहाटे ही काठी गावातून निघेल. रात्री कासेगावात मुक्कामाला असेल व यात्रेच्या आधी जोतिबावर दाखल होईल.

Web Title: Kolhapur News Padali Ninam Sasankathi on way to Jotiba

टॅग्स