पंचगंगा नदी प्रदुषण प्रश्नी जनआंदोलन उभारणार - धैर्यशिल माने

सागर कुंभार
रविवार, 27 मे 2018

रुकडी - "पंचगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून विविध भागांमधून येणाऱ्या नाल्यातील मैलायुक्त व रसायनयुक्त सांडपाण्यामूळे दररोज 40 एमएलटी दूषित पाणी प्रक्रियेविना थेट नदीत मिळत आहे. त्यामुळे नदीकाठच्या सुमारे 38 हून अधिक गावातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी जनआंदोलन उभारण्यात येईल, अशी माहिती माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी दिली.

रुकडी येथील (कै ) बाळासाहेब माने ग्रामपंचायत सभागृहात आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी पंचगंगा नदी बचाव कृती समितीची स्थापनाही करण्यात आली. 

एक जूनपासून साखळी उपोषण...
हा प्रश्नमार्गी लावण्यासाठी रुकडीतून एक जूनपासून साखळी उपोषणास सुरुवात होणार असून नदीकाठच्या प्रत्येक गावात साखळी उपोषण चालू ठेवणार, अशी माहिती पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्यावतीने देण्यात आली. 

दरम्यान, पंचगंगा नदी शुध्दीकरणासाठी जिल्हा परिषद मार्फत 108 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. मात्र सध्याच्या लोकप्रतिनीधींच्या दुर्लक्षामुळे तो लालफितीतच अडकून पडला आहे. त्यामूळे कोल्हापूर जिल्ह्यास हरित क्रांतीसाठी वरदायनी ठरलेली पंचगंगा वाचवणे काळाजी गरज बनली आहे. यासाठी करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील नदीकाठच्या गावात जनआंदोलन उभारून तीव्र लढा उभा करणार. तसेच नदीकाठच्या ग्रामपंचायतींकडून नदी प्रदूषणाबाबत ठराव घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार असल्याची माहिती पत्रकार बैठकी दरम्यान श्री. माने यांनी दिली.

यावेळी सरपंच रफिक कलावंत, शितल खोत, अमोल कुलकर्णी, बबलू मकानदार, दिलीप इंगळे, शिवाजीराव घोरपडे, अनिल बागडी - पाटील, झाकीर भालदार, शरद निंबाळकर उपस्थित होते. 

Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue