पंचगंगा प्रदुषणाविरोधात शिरढोण येथे आंदोलन

अनिल केरीपाळे
सोमवार, 4 जून 2018

कुरुंदवाड - पंचगंगा नदी प्रदुषणाकडे लक्ष वेधण्यासाठी शिरढोण येथील प्रदुषण विरोधी कार्यकर्त्यांनी आज ग्रामपंचायतीसमोर गळ्यात जलपर्णी अडकवून अनोखे आंदोलन केले. यावेळी पंचगंगा प्रदुषणमुक्त झालीच पाहिजे, अशा घोषणा देत प्रदुषण नियंत्रण मंडळ पाटबंधारे विभाग व शासनाच्या विरोधात जोरदार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.

शिरढोण गावाला पंचगंगा प्रदुषणाचा सर्वाधिक फटका बसला आहे. आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक वर्षापासून मागणी करुनही पंचगंगा प्रदुषणाकडे शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. परिणामी शेती पशुधन व जनतेलाही फटका बसत आहे. शासनाच्या अनास्थेचा निषेध करण्यासाठी आज ग्रामस्थानी ग्रामपंचायत कार्यालयाच्यासमोर लाक्षणिक उपोषणाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज सकाळी महात्मा गांधींच्या प्रतिमेचे पूजन करुन गळ्यात जलपर्णी अडकवून उपोषणाला प्रारंभ केला. 

जि. प. चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, विश्वास बालिघाटे, प्रशांत कुगे, मधुकर सासणे, शिवानंद कोरबू, प्रा. चंद्रकांत मोरे, बाळासो माणगावे, अविनाश पाटील, सतिश भंडारे, बाबुराव कोईक, संजय शिंदे, गजानन चंदूरे, राजेखान नदाफ, विलास चौगुले, मनोज गुरवान उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue