पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार

अतुल मंडपे
सोमवार, 11 जून 2018

हातकणंगले - पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न आता वेगळया वळणांवर येऊन ठेपला असून प्रदूषित झालेली पंचगंगा नदीच चक्क चोरीला गेली असल्याची तक्रार पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्या वतीने समन्वयक धैर्यशील माने यांनी आज हातकणंगले पोलीसांत दिली. मात्र तांत्रिक दृष्टया अशी तक्रार दाखल करता येत नसल्याची भूमिका पोलीसांनी घेतली.यामुळे काही वेळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

हातकणंगले - पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न आता वेगळया वळणांवर येऊन ठेपला असून प्रदूषित झालेली पंचगंगा नदीच चक्क चोरीला गेली असल्याची तक्रार पंचगंगा नदी बचाव कृती समितीच्या वतीने समन्वयक धैर्यशील माने यांनी आज हातकणंगले पोलीसांत दिली. मात्र तांत्रिक दृष्टया अशी तक्रार दाखल करता येत नसल्याची भूमिका पोलीसांनी घेतली.यामुळे काही वेळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी पंचगंगा बचाव कृती समितीच्यावतीने गेले काही दिवस आंदोलन, साखळी उपोषण सुरू आहे. पंचगंगा नदी प्रदूषीत झाली आहे त्यामूळे नदीवर जलप्रणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने रुकडी (ता. हातकणंगले) व आसपासच्या गावातील छोटे मच्छीमार यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. पोट पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्यामूळे आज ज्या घटकामूळे पंचगंगा नदी प्रदूषीत झाली आहे, या घटकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा व स्वच्छ पाणी आम्हाला मिळावे यासाठी नदी चोरीला गेली आहे असे उपरोधक निवेदन जि. प चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हातकणंगले पोलीसात देण्यात आले. 

आज दुपारी एकच्या सुमारास रूकडी येथून मच्छीमार व धनगर समाजातील नागरिक हातात टोपले, जाळी घेऊन हातकणंगले पोलीस ठाण्यात आले. पंचगंगेच्या दुषीत पाण्यामुळे आजपर्यत अनेक लोकाना प्राण गमवावे लागेल आहेत तसेच अनेक रोगांना सामोरे जावे लागले आहे. अनेक कारखान्याचे दुषीत सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते तसेच मैलामिश्रीत पाणीही कोणतीही प्रकीया न करता थेट नदीत मिसळते. संपूर्ण नदीवर केंदाळ पसरले आहे. त्यामूळे मच्छिमाराचा संपूर्ण व्यवसाय बंद पडला आहे. त्याच्यावर उपासमारीची वेळ आल्याने अखेर  सनदशीर मार्गाने " नदी चोरीला गेली आहे " अशी फिर्याद देवून शासनाचे डोळे उघडणेचा प्रयत्न करण्यात आला. 

ही तक्रार देण्यासाठी माजी. जि. प अध्यक्ष धर्येशील माने, माजी पंचायत समिती सदस्य बबलू मकानदार, रुकडीचे सरपंच, राफिक कलावंत, उपसरपंच शितल खोत, नंदू साठे, महेश चव्हाण, अविनाश बनगे, राकेश खोंद्रे, अशोक बागडी, संभाजी बागडी, ताराबाई शिनगारे आदी उपस्थित होते.

चंदकांत पाटील सध्या प्रभारी मुख्यमंत्री म्हणून काम पहात आहेत. त्यांनी या काळांत मुख्यमंत्री म्हणून पंचगंगा प्रदूषणाबाबत मंत्रालयात बैठक लावून हा प्रश्न कायमचा सोडवून कोल्हापूरच्या जनतेला मुख्यमंत्रीपदाची भेट दयावी. 

- धैर्यशील माने

Web Title: Kolhapur News Panchagang River Pollution Issue