पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी महापालिकेस नोटीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

कोल्हापूर - पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी करवीर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यात आलेल्या अपयशास जबाबदार धरून आपल्यावर फौजदारी का करू नये, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

कोल्हापूर - पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी करवीर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी महापालिकेला नोटीस बजावली आहे. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यात आलेल्या अपयशास जबाबदार धरून आपल्यावर फौजदारी का करू नये, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

पंचगंगा प्रदूषणाबाबत करवीर उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे यांच्यासमोर आयुक्‍त, उपायुक्‍त, मुख्य आरोग्य अधिकारी व पर्यावरण अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यावर दिलेल्या निर्णयात म्हटले आहे की, पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यात आलेल्या अपयशास जबाबदार म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मधील कलम १३३ अन्वये कारवाई करण्याबाबत आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पंचगंगा नदीच्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास तसेच जीवितास धोका असल्याने चौकशी करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.

नोटिसीत म्हटले आहे...

  •  नाला थेट ओढ्यात मिसळतो

  •  सांडपाणी व रसायनयुक्त पाणी नदीत

  •  प्रक्रिया न करताच सांडपाणी नदीत

  •  नागरिकांच्या आरोग्यास धोका शक्‍य

तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे  प्रतिदिन निर्माण होणाऱ्या सांडपाणी व रसायनयुक्त पाणी थेट नाल्यात मिसळते. नाला ओढ्याला मिळत असून ओढ्यातून नदीत जाणाऱ्या पाण्यामुळे साथ पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. प्रक्रिया न करताच सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्यामुळे सार्वजनिक उपद्रव निर्माण झाला आहे.  प्रजासत्ताकचे दिलीप देसाई यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
 

Web Title: Kolhapur News Panchaganga Pollution issue