प्लास्टिकमुक्त कोल्हापूर हाच शिवसेनेचा नारा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

कोल्हापूर - "प्लास्टिकमुक्त कोल्हापूर' असा नारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज देण्यात आला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कापडी पिशव्यांचे वाटप झाले. सुमारे एक लाख पिशव्या वाटण्याचा संकल्प शिवसेनेने केला आहे. 

प्लास्टिक आणि कॅरीबॅगच्या अति वापरामुळे पर्यावरणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. प्लास्टिक पाण्यात विरघळत नसल्याने प्रदूषणात भर पडत आहे. 

जिल्हा शिवसेना व युवा सेनेतर्फे शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. महापौर हसीना फरास, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे खेडेकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, शिवाजी जाधव, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, गटनेता नियाज खान, नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे, नगरसेवक राहुल चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ प्रा. जय सामंत व पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांना वसुंधरा पुरस्कार शिवसेनेतर्फे जाहीर झाला. गायकवाड यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. 

महापौरांसह उदय गायकवाड, संजय पवार व विजय देवणे यांनी मार्गदर्शन केले. प्लास्टिकमुक्त कोल्हापूर ही काळाची गरज बनली आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होतेच, पण पाण्याचे कधी न संपणारे प्रदूषण होते. नदी, नाले, ओढे यासह पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत प्रदूषणाचा सामना करत आहेत. भावी पिढीला नैसर्गिक वातावरणात राहायचे असेल, तर प्लास्टिक टाळायला हवे, घरातून निघताना कापडी पिशवी घेऊन बाहेर पडणे, हा उपाय आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतही प्लास्टिकचा वापर टाळावा. व्यापारी, दुकानदारांनी प्रदूषणाची तीव्रता ओळखून प्लास्टिक पिशवी अथवा कॅरीबॅग देणे बंद करावे. 

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून प्लास्टिकमुक्त कोल्हापूरचा संकल्प करत असल्याचे पवार यांनी सांगितले. उदय गायकवाड यांनी प्लास्टिक वापराच्या पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती दिली. 

या वेळी शुभांगी पोवार, रिया पाटील, बाजीराव पाटील, संभाजी भोकरे, सुजित चव्हाण आदी उपस्थित होते. 

Web Title: kolhapur news plastic shiv sena