कळंबा कारागृहात कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

राजेश मोरे
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - कळंबा कारागृहामध्ये कैद्याने नैराश्येतून हात, पाय, पोटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गणेश पोपट शिंदे (वय 30, रा. कुर्डुवाडी, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. 

कोल्हापूर - कळंबा कारागृहामध्ये कैद्याने नैराश्येतून हात, पाय, पोटावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गणेश पोपट शिंदे (वय 30, रा. कुर्डुवाडी, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. 

खुनाच्या गुन्हातून त्याला शिक्षा झाली होती. 2014 पासून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. दाडीसाठी दिल्या जाणाऱ्या ब्लेडचा वापर करून त्याने आत्महत्याचे प्रयत्न केला. पाच नंबर सर्कल शाैचालयात त्याने हात, पाय व पोटावर जवळपास दहा वार करून घेतले. त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. कारागृह प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचे कारागृह अधीक्षक शरद शेळके यांनी सांगितले. 

Web Title: Kolhapur News Prisoner's Suicide Attempt in Kalamba Jail