शासनाचा कारभार मुर्दाडपणाचा - प्रा. डॉ. एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 मार्च 2018

कोल्हापूर - शासनाचा कारभार मुर्दाडपणाचा असून हे भेकड शासन आहे, असा घणाघाती प्रहार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज येथे केला. 

कोल्हापूर - शासनाचा कारभार मुर्दाडपणाचा असून हे भेकड शासन आहे, असा घणाघाती प्रहार ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज येथे केला.

शिक्षण वाचवा नागरी कृती समितीतर्फे आयोजित शाळा वाचवा मोर्चा प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील सभेत ते बोलत होते. 

डॉ. पाटील म्हणाले, "राज्य शासनाचे शैक्षणिक धोरण ठेंगा दाखवणारे आहे. राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय धोक्याची घंटा आहे. अशा वेळी शांत बसलो तर शासन दुप्पट वेगाने तेरा हजार शाळा बंद करेल. असे घडले तर वर्तमान व भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही. शासनाचा कारभार मुर्दाडपणाचा आहे. जनतेच्या भावनांची त्यांना कदर नाही.

पाॅलिटिकल विल त्यांच्याकडे दिसत नाही. जिरायत व बागायतदार शेतकरी आत्महत्या करत आहे. शासनाची भूमिका अन्यायी आहे. त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी तिहेरी हल्ला करण्याची वेळ आली आहे. लढ्याची ही कृती शेवटची नाही.

-  प्रा. डॉ. एन. डी. पाटील

या वेळी डी. बी. पाटील, अशोक पोवार, वसंतराव मुळीक, रमेश मोरे, डी. जी. लाड आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्टमंडळ पोचल्यानंतर देण्यात आलेल्या घोषणा अशा : 

  • विनोद तावडे राजीनामा द्या 
  • पालकमंत्री पे हल्लाबोल, विनोद तावडे पे हल्लाबोल 
  • शिक्षण वाचवा नागरी कृती समितीचा विजय असो
  • या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय 

शाहु महाराज यांनी सुरु केलेले शिक्षण हे मोफत होते. अशा या शिक्षणाचे आज खासगीकरण होत आहे. अशा शाळात सर्वसामान्य गोरगरिबांची मुले शिकणेच शक्य नाही. शिक्षणाचा हक्क मुलांकडून हिराऊन घेण्याचा हा प्रकार आहे. त्यास आमचा विरोध आहे. यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
आमच्या शिक्षकांच्या 
गीता मरकुटे,
 

शिक्षक, कार्वे, चंदगड

गरीबांना शिक्षण मिळावे यासाठी शाळा बंद करू नयेत. मोफत शिक्षण सुरु आहे ते सुरु ठेवावे. शिक्षकांच्या काही मागण्या आहेत या मोर्चाद्वारे आम्ही त्या सरकारसमोर मांडत आहोत.
सुनिल खोत,
  शिक्षक, कागल तालुका

Web Title: Kolhapur News Prof. N. D. Patil comment