चंदूर येथे दोन गटात मारामारी, सहा जण जखमी

राजेंद्र होळकर
मंगळवार, 5 जून 2018

इचलकरंजी - चंदूर (ता. हातकणगंले) येथील आभार फाटा शेजारील पाण्याच्या टाकीजवळ आज दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन गटात सशस्त्र मारामारी झाली. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. हे दोन्ही गट एकमेकाचे नातेवाईक आहेत. जखमीपैकी दोघे जण गंभीर जखमी आहेत.

मारामारीमध्ये तलवार, कुऱ्हाड, काठी याचा वापर केला आहे. याप्रकरणी येथील शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. जखमीमध्ये रामा बापू मंगसुळे त्याचा सख्खा भाऊ बाळू बापू मंगसुळे, चुलत भाऊ महाळू मनू मंगसुळे, शिवाजी बापू पुजारी, युवराज शिवाजी पुजारी, सागर शिवाजी पुजारी यांचा समावेश आहे

या जखमीपैकी रामा मंगसुळे त्याचा सखा भाऊ बाळू मंगसुळे हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्या डोक्याला व मानेवर गंभीर वार झाले आहेत. या जखमीपैकी रामा मंगसुळे, बाळू मंगसुळे, महाळू मनू मंगसुळे या तिघांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात तर शिवाजी पुजारी, युवराज पुजारी, सागर पुजारी यांच्यावर येथील आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसातून समजलेली माहिती अशी पुजारी आणि मंगसुळे या दोन्ही गटात सहा महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती.

Web Title: Kolhapur News quarrel in Chandur