इचलकरंजी परिसरात जुगार अड्ड्यावर छापे, 32 जण ताब्यात

राजेंद्र होळकर
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

इचलकरंजी - येथील सम्राट अशोकनगर आणि डेक्कन मिल शेजारील दत्तनगर व तारदाळ, योगानंदनगर (ता.हातकणंगले) येथे सुरू असलेल्या अवैध तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात  जुगार खेळणाऱ्या 32 जणाना अटक करण्यात आले.

इचलकरंजी - येथील सम्राट अशोकनगर आणि डेक्कन मिल शेजारील दत्तनगर व तारदाळ, योगानंदनगर (ता.हातकणंगले) येथे सुरू असलेल्या अवैध तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात  जुगार खेळणाऱ्या 32 जणाना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून 67 हजार 290 रूपये आणि 3 लाख 55 हजार रूपये किंमतीच्या 10 मोटरसायकलीसह वेगवेगळ्या कंपनीचे 20 मोबाईल संच असा सुमारे 4 लाख 56 हजार 90 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

मोनू रामधारी केसरवाणी, रोहित प्रमोद केशरवाल, विरेंद्र माणिकचंद केसरवाणी, मोहीनलाल माताप्रसाद केसरवाणी, कोमलचंद्र कन्नय्यालाल केशरवाल, शिवाबाबू रंगनाथ केसरवाणी (सर्व रा.पुजारी मळा), अमीर गौस डांगे, घनसिंग शंकर रोठड (दोघे रा.दत्तनगर, शहापूर), तौसीफ अकबर मुल्ला (रा.जाधव मळा), अबू हनीफ बारीगड्डी (रा.शांतीनगर), इलाई युसूफ शेख (रा.आण्णा रामगोंड शाळेशेजारी), रमय्यालाल रामप्रताप केसरवाणी (रा.पंचवटी टॉकीजच्या मागे), गजानन असिलकर, नवनाथ सुभाष पाटील, नवनाथ दादासो एडके, अमोल प्रभाकर कोंठारे, उत्तम रावसो बंडगर, सरफराज शराफतअल्ली सय्यद, विठ्ठल कोंडिबा सावंत, रविंद्र नारायण धोतरे, शुभम संजय गावडे, निलेश नारायण तावरे, राजू आण्णाप्पा चौगुले (सर्व रा.तारदाळ), गोविंद पांडूरंग कुलकर्णी, प्रविण शंकर मोहिते, शिवानंद दऱ्याप्पा नाईक (तिघे रा.नेहरूनगर), राजू चिदानंद नाईक, नौशाद अमीर मुल्ला, संजय रामकिशोर दायमा, अशिष तानाजी पालकर (रा.सम्राट अशोकनगर), गजबा हमीदसाब मुजावर (चौघे रा.शिवनाकवाडी, ता.शिरोळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

येथील सम्राट अशोकनगर आणि डेक्कन मिल शेजारील दत्तनगरमध्ये सुरू असलेल्या दोन क्‍लबवर पोलीस उपाधिक्षक विनायक नरळे यांनी तर तारदाळ, योगानंदनगर (ता.हातकणंगले) येथील एका अड्ड्यावर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांनी कारवाई केली. 

 

Web Title: Kolhapur News The raid on the gambling stand, 32 people in custody