रायगड संवर्धनासाठी शिवभक्तांची मते घेणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

परिसंवादासाठी देशभरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना आमंत्रित केल्याची माहितीही दिली. तसेच पर्यटन विकासासाठी गडकोटांचे महत्त्व स्पष्ट करत गडकोटांच्या डागडुजीकडे लक्ष वेधले. त्यावर श्री. फडणवीस यांनी शिवभक्तांच्या मतांतूनच रायगडाचा विकास होईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर गडकोटांचा विकास करण्याविषयी चर्चा झाली.

कोल्हापूर : दुर्गराज रायगड संवर्धनासाठी शिवभक्तांची मते विचारात घेतली जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडच्या विकासासाठी शिवभक्तांची मते विचारात घेणे महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितल्यानंतर श्री. फडणवीस त्यास मान्यता दिली. मंत्रालयात त्याबाबतची बैठक झाली.

रायगड संवर्धन विकास आराखड्यानुसार गडावर व परिसरात कामे सुरू झाली आहेत. हजारो लोकांनी गडावर श्रमदान केले आहे. मात्र हा आराखडा परिपूर्ण होण्याची गरज आहे. यंदा 6 जूनला शिवराज्याभिषेक होत असून, शिवराज्याभिषेकाच्या पूर्वसंध्येला अर्थात पाच जूनला 'संवर्धन रायगडाचे मत शिवभक्तांचे' विषयावर परिसंवाद होत आहे. त्याची माहिती देत संभाजीराजे यांनी रायगड विकास आराखडा अधिक परिपूर्ण बनविण्यासाठी शिवभक्तांच्या संकल्पनेतून रायगडाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, अशी सूचना केली.

परिसंवादासाठी देशभरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना आमंत्रित केल्याची माहितीही दिली. तसेच पर्यटन विकासासाठी गडकोटांचे महत्त्व स्पष्ट करत गडकोटांच्या डागडुजीकडे लक्ष वेधले. त्यावर श्री. फडणवीस यांनी शिवभक्तांच्या मतांतूनच रायगडाचा विकास होईल, अशी ग्वाही दिली. त्यानंतर गडकोटांचा विकास करण्याविषयी चर्चा झाली.

या प्रसंगी पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावळ, मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पर्यटन व सांस्कृतिक खात्याचे सचिव नितीन गद्रे, ऊर्जा खात्याचे सचिव अरविंद सिंग, सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव आशीष सिंह, पुरातत्त्व खात्याचे संचालक एम. नंबीराजन, कोकण विभागाचे आयुक्त प्रभाकर देशमुख उपस्थित होते.

Web Title: Kolhapur News Raigad fort devendra fadnavis sambhaji raje chatrapati