शहरात पावसाची तुरळक भुरभुर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - जिल्ह्यात काल (मंगळवार)पासून पावसाने अधूनमधून भुरभुर सुरू केली आहे. पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा येथे काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावून शेती आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. गेल्या 20-25 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने तुरळक प्रमाणात का असेना, हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 

हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल व गडहिंग्लज तालुक्‍यात अत्यल्प पाऊस झाला. भुदरगड 5.60, आजरा 5.75 व चंदगडमध्ये 10.67 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील धरणांचा साठा समाधानकारक आहे. राधानगरी धरणातील एकूण 8.36 टीएमसीपैकी 8.13 टीएमसी साठा आहे. तुळशीमध्ये 3.47 पैकी 3.42, वारणा धरणात 32.39 टीएमसी, दूधगंगा 22.25 टीएमसी भरले आहे. 

Web Title: kolhapur news rain