राजर्षी शाहूंच्या विचारांचा आज जागर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

जयंतीनिमित्त शहर बनले शाहूमय - वारकऱ्यांच्या दिंड्याही बाहेर पडणार

कोल्हापूर - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जयघोष, ईदनिमित्त नमाज पठण आणि विठूनामाच्या गजरात रवाना होणाऱ्या दिंड्या, असा अनोखा मिलाफ उद्या (ता. २६) कोल्हापूरनगरीत अनुभवता येणार आहे. सामाजिक सलोख्याचे शहर अशी ख्याती असणाऱ्या या नगरीत राजर्षी शाहूंच्या जयंतीनिमित्त शाहू महाराजांच्या विचारांचा जागर केला जाणार असून रमजान ईदच्या नमाज पठणातून विश्‍वशांतीचा संदेश दिला जाणार आहे. ‘विठू नाम ओठी, आम्हा लोकांत एकी’चा संदेश देत वारकऱ्यांचा उत्साह 
सळसळणार आहे. 

रयतेचे राजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापूर शाहूमय झाले. शाहू विचारांचा जागर ठिकठिकाणी करण्यात येत असून उद्या शाहू विचारांची कृतिशील ज्योत मनामनात प्रज्वलित करण्यात येणार आहे. शासनातर्फे शाहू जन्मस्थळ असलेल्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे सकाळी आठ वाजता शाहू महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे.

शाहूंनी कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याला विविध उपक्रमांच्या माध्यमातून वंदन केले जाणार आहे. याच वेळी मुस्लिम बांधव नमाज पठणातून मानवा-मानवातील बंध घट्ट करणार आहेत. मानवकल्याणाची आर्त हाक ते नमाजातून देणार असून त्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव मशिदीच्या परिसरात उपस्थिती लावतील. वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असून उद्या उत्तरेश्‍वर पेठ, शनिवार मंडप, कसबा बावड्यातून शेवटच्या दिंड्या बाहेर पडणार आहेत. टाळ-मृदंगाच्या गजरात भगव्या झेंड्यांसह या दिंड्या सामाजिक एकोप्याचे सुंदर नाते उलगडतील.

Web Title: kolhapur news rajarshi shahu maharaj birth anniversary