गडहिंग्लजला आढळला दुर्मिळ चित्रांग नायकूळ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 मार्च 2018

गडहिंग्लज - येथील बांधकाम सभापती नरेंद्र भद्रापूर यांच्या घराशेजारी बांधकामाच्या ठिकाणी चित्रांग नायकूळ जातीचा दुर्मिळ साप आढळला. सर्पमित्रांनी त्याला पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने अधिवासात सोडून दिले. 

श्री. भद्रापूर यांच्या घराशेजारी बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या ठिकाणी भद्रापूर यांना साप दिसाला. त्यानंतर त्यांनी सर्पमित्र मेहबुब सनदी, नदीम नदाफ, विनायक चव्हाण यांना बोलावून घेतले. सर्पमित्रांनी सापाला पकडले. त्याचे निरीक्षण केल्यानंतर हा चित्रांग नायकूळ साप असल्याचे लक्षात आले. वनरक्षक कृष्णा डेळेकर, नागेश खोराटे यांच्या सहकार्याने या सापाला त्याच्या अधिवासात सोडून देण्यात आले.

चित्रांग नायकूळ हा साप सर्वसाधारणत: एक ते तीन फुटापर्यंत वाढू शकतो. तपकीरी आणि राखाडी रंगाच्या शरीरावर काळी किनार असलेले पिवळे खवले असतात. खवले डोक्‍याकडे गडद व शेपटीकडे अस्पष्ट असतात. दिवसा बाहेर पडणारा हा साप अत्यंत चपळ असतो. 

Web Title: Kolhapur News rare snake species found in Gadhinglaj