‘नीम’अंतर्गत भरणार शिवाजी विद्यापीठात पदे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठातील काही रिक्त पदे नॅशनल इम्पलॉयबिलिटी ऑफ इनहान्समेंट मिशन (नीम) रेग्युलेशन अंतर्गत भरण्यास व्यवस्थापन परिषदेत आज मान्यता दिली. किमान सहा महिने व जास्तीत जास्त तीन वर्षे पदांवर काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या पदांवर कामातून त्यांचे ‘स्किल’ वाढावे, हा हेतू असल्याचे सांगण्यात येते. परदेशी विद्यार्थ्यांना विद्यापीठातील विविध अधिविभाग व संलग्नित महाविद्यालयांत पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याबाबतच्या नियमावलीस मान्यता देण्यात आली. एम. बी. ए. युनिटमध्ये पी. जी. डिप्लोमा इन ई-बिझनेस, दूर शिक्षण केंद्रांतर्गत बी. ए. होम सायन्स, एम. ए. सायकॉलॉजी व एम. पी. एड. अभ्यासक्रम सुरू करण्यासही मान्यता दिली आहे. तसेच अधिविभागांत ॲडजंक्‍ट प्रोफेसर, रिसर्च प्रोफेसरांची नेमणूक करण्यासह विद्यापीठ व आयआयजीएम (नवी मुंबई) यांच्यातील सामंजस्य कराराच्या नूतनीकरणासही मान्यता देण्यात आली. 

Web Title: Kolhapur News recruitment in Shivaji University