इचलकरंजीत औषध दुकानामध्ये चोरी 

राजेंद्र होळकर
बुधवार, 21 फेब्रुवारी 2018

इचलकरंजी - येथील कागवाडे मळ्यातील "शतायु" या जेनेरिक औषधी दुकानाच्या लोखंडी दरवाज्याची चोरट्याने कडी कोयडा आणि कुलुप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील लाकडी कॅश काऊंटर मधील एक हजार पाचशे रुपये आणि दोन संगणक संच असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. ही चोरी मध्यरात्रीच्या सुमारास झाली असून, चोरीचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला.

इचलकरंजी - येथील कागवाडे मळ्यातील "शतायु" या जेनेरिक औषधी दुकानाच्या लोखंडी दरवाज्याची चोरट्याने कडी कोयडा आणि कुलुप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील लाकडी कॅश काऊंटर मधील एक हजार पाचशे रुपये आणि दोन संगणक संच असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला.

ही चोरी मध्यरात्रीच्या सुमारास झाली असून, चोरीचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. ही चोरीची घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्यावरून पोलिस पुढचा तपास करत आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी -  "शतायु" हे जेनेरिक औषधी दुकान अनुप बाळासाहेब चौगुले (रा.कचरे सोसायटी, जयसिंगपूर) यांच्या मालकीचे आहे. त्यांनी काल (ता. 20) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले. दुकानाच्या दरवाज्याला कुलुप लावून ते जयसिंगपूरला निघून गेले. दुकानामध्ये कोणीही नाही याची संधी साधून चोरट्याने दुकानाच्या लोखंडी दरवाज्याची कडी कोयडा आणि कुलुप तोडून आत प्रवेश केला. दुकानातील लाकडी कॅश काऊंटर मधील एक हजार पाचशे रुपये आणि दोन संगणक संच असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. 

आज सकाळी दुकानाचा दरवाजा उघडा असल्याची बाब शेजारील नागरीकांच्या निदर्शनास आला. त्यांनी यांची माहिती दुकान मालक श्री. चौगुले यांना फोनवरुन दिली. त्यामुळे ते त्वरीत दुकानाकडे आले.  त्यानंतर श्री.चौगुले यांनी चोरीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन दुकानासह परिसराची पाहणी केली. दुकानामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरी करणारा चोरटा कैद झाला आहे. त्यावरुन पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला आहे.

 

Web Title: Kolhapur News robbery incidence in Medical store