‘गोड उसाची कडू कहाणी व्हिडिओ पाहिला २६ लाखांवर लोकांनी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

कोल्हापूर -  साखर कारखान्यांना ऊस नेणाऱ्या बैलगाड्यांसमोरील विविध अडचणींचा व्हिडिओ ‘सकाळ’ने फेसबुक पेजवर ‘अपलोड’ केल्यानंतर तो तब्बल २६ लाख ६४ हजारांवर लोकांनी पाहिला आहे. ३७ हजार लोकांनी त्याला प्रतिसाद देत, ‘कमेंट’ दिल्या आहेत; तर पंधरा हजार लोकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, या साऱ्यांचा परिणाम  म्हणून राजाराम साखर कारखान्याने राजाराम बंधाऱ्यावर आता बैलगाडी ओढण्यासाठी हंगामात कायमस्वरूपी ट्रॅक्‍टर देण्याचा निर्णय घेतला आहे. 

साखर हंगाम सुरू झाला, की ऊसतोडणी कामगारांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला जातो. यापूर्वीही अनेकदा हा विषय चर्चेत आला. मात्र, यंदा ‘सकाळ’ने हा विषय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ‘गोड उसाची कडू कहाणी’ या मथळ्याखाली चर्चेत आणला आणि या विषयावर व्यापक चर्चा झाली.

नेटिझन्स म्हणतात...
साखर गोड कशी लागेल? कष्टाला सीमा नाही. रक्ताचं पाणी होणं म्हणजे काय, हे कष्ट करणाऱ्यालाच माहीत. या बैलजोडीचे व माउलीचे कष्ट यांची कुठे तुलना करावी हेच कळत नाही. मन हेलावून जातंय...

- नितिन काटे

हा व्हिडिओ पाहताना माझे डोळे पाण्याने भरले. त्या कष्टाचे मोलच करता येत नाही.

गोपाल भोसले

Web Title: Kolhapur News Sakal Video Seen by 26 lakh peoples